Eid-e-Miladunnabi 2019: श्रीरामपुरात पैगंबर जयंती उत्साहात साजरी
सजग नागरिक टाइम्स : Eid-e-Miladunnabi 2019 :श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मदिन
ईद ए मिलादून्नबी म्हणून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .यानिमिताने आज शहरात वॉर्ड नं २ मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यात सुमारे सात हजार मुस्लीम बांधव सामिल झाले होते . सकाळी ९ वाजता सय्यद बाबा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला .
मौलाना आजाद चौक , गुलशन चौक , मिल्लत नगर ,फातेमा कॉलनी , काजीबाबा रोड , पापाभाई जलाल रोड मार्गे मिरवणुकीची जामा मशिदीत सांगता झाली .
मिरवणुकीत अग्रभागी मौलाना मोहमद ईमदादअली व ईतर मौलवी गण रथात विराजमान होते . मिलाद पठन तसेच नाअत पठन सुरू होते.
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महाप्रसाद रुपाने मिठाई व विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत ज्येष्ठ नेते उपनगराध्यक्ष करण ससाणे,
सचिन गुजर, नगरसेवक अंजूमभाई शेख , मुख्तार शाह , अशोक कानडे , विजय खाजेकर,मुन्ना पठाण , कलीम कुरेशी ,रज्जाक पठाण , रियाज पठाण ,
शकूर शेख ,डॉ. राज शेख, तन्वीर रजा ,मुख्तार खान, जाफर शाह , रऊफ शाह आदि सामिल झाले होते .
दावते इस्लामी या संघटनेने मिरवणुकीत विविध प्रतिकृती व देखावे सादर केले. गेले बारा दिवस विविध मशिदीतून झालेल्या मजलीस ए सिरतुन्नबी ची आज सांगता झाली.
आजची मिरवणूक व विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जामा मशिद ट्रस्ट , दावते इस्लामी, सुलताने हिन्द फाऊंडेशन, यंग आझाद ग्रुप ,
अल फतेह सोशल ग्रुप ,नुरे इलाही ग्रुप, यलगार ग्रुप, हस्नैनपूरा यंग सर्कल व विविध संघटनांच्या स्वयंसेवकानी प्रयत्न केले .
पैगंबर जयंतीनिमिताने अतिरीक्त पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक मदने, पो.नि.
श्रीहरी बहिरट व त्यांच्या सर्व सहकाऱयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.