ब्रेकिंग न्यूजताज्या घडामोडी

अरविंद केजरीवाल यांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा

Advertisement

सजग नागरिक टाइम्स:

नवी दिल्ली  : आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. लवकरच ते तिहार जेलमधून बाहेर येण्याची शक्यता आहे. येत्या २५ मे रोजी दिल्लीची लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. केजरीवाल यांना १ जूनपर्यंतच अंतरिम जामीन मिळाला आहे. मात्र त्यांना २ जून पासून स्वत:ला पुन्हा आत्मसमर्पण करावं लागणार आहे. जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला असल्याची माहिती समोर आली.

दारू घोटाळ्या प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना अटक केली होती. अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीचा मोठा चेहरा आहे. त्यामुळे ते तुरूंगातून सुटल्यानंतर प्रचारात भाग घेऊ शकतात. केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Advertisement

केजरीवाल लवकर सुटून यावे यासाठी कार्तकर्ते प्रयत्न करत होते. ते धरणे आंदोलनाला बसले होते. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होताना दिसत आहे. केजरीवाल यांच्या जामीनाला केंद्राने विरोध केला आहे. ७ मे रोजी युक्तीवाद केला होता. कोर्टाने दोन्ही पक्षांचा निर्णय ऐकला आणि तो राखून ठेवला असून तो निर्णय आज जाहीर करण्यात आला.

ईडीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. तेव्हा केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला होता. ईडीच्या डिप्युटी डायरेक्टर भानु प्रिया यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. निवडणूक प्रचाराच्या आधारावर जामीन मंजूर करू नये, असं भानु प्रिया यांचं म्हणणं होतं. पण शेवटी केजरीवाल यांना १ जूनपर्यंतच अंतरिम जामीन मिळाला आहे.

Share Now