Homeताज्या घडामोडीदोन समाजात तेढनिर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी मिलिंद एकबोटेवर गुन्हा दाखल.

दोन समाजात तेढनिर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी मिलिंद एकबोटेवर गुन्हा दाखल.

(Milind Ekbote) संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी दि. ०५.०३.२०२१ रोजी दिली फिर्याद

(Milind Ekbote) समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात उभे राहून एक विडीयो बनविला व तो वायरल केला.

सदरील विडीयो मध्ये अनेकांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्या प्रकरणी एकबोटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered against Milind Ekbote for claiming that Kondhwa Mini Pakistan.

सदरील भाषणाचे थोडक्यात वक्तव्य पुढीलप्रमाणे

 “कोंढव्यामध्ये हज हाऊस बनण्याचे काम पुणे महानगरपालिकेने चालू केले आहे. ते अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. या ठिकाणी अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे केंद्रीय गुप्तचर खात्यांच तस अहवाल आहे,पुणेकरांच जीव धोक्यात आहे , समस्त हिंदू आघाडी आपली ताकद पणाला लावेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, की समस्त हिंदू आघाडी काहीही झालं तरी महानगरपालिका प्रशासनाचा हज हाऊस चा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही.” जय श्रीराम !”

सदर गंभीर प्रकाराबाबत  संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी  दि. ०५.०३.२०२१ रोजी या संदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करणेबाबत लेखी तक्रार दिली होती.

त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे विरोधात कलम १५३, १५३अ, १५३ब,

२९५अ, २९८, ५००, ५०१, ५०२, ५०५(१)(क), ५०५(२) व ३४ &  १२०ब  भारतीय दंड संहिता,

१८६० &  कलम ६६अ व ६६ब  माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत संभाजी ब्रिगेड चे उपाध्यक्ष  सतीश काळे यांनी फिर्याद दाखल केली .

त्यांना याकामी  कायदेशीर मदत ॲड तोसीफ शेख, ॲड  क्रांती सहाणे यांनी केली असल्याची माहिती मिळाली .

वाचा :शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व सी ए ए च्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर rpi(i)चा मोर्चा.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular