शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व सी ए ए च्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर rpi(i)चा मोर्चा.

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

(RPI (i) strikes ) सजग नागरिक टाइम्स :

(RPI (i) strikes ) शेतकर्‍यांनवर लादलेल्या कायद्या विरोधात जिथे देशभर आंदोलने उपोषणे चालू असल्यास पुणेकर मागे कशे राहतील ,

शेतक-याची या कायद्यापासून सुटका व्हावी तसेच सी ए ए कायदा,महागाई दूर व्हावी म्हणून

काल काल दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पुणे येथे RPI I पक्षाकडून आणि शेतकरी संघटन आणि इतर बहुजन संघटना यांच्या तर्फे निषेध करण्यात आले.

RPI (i) strikes at Pune Collector's Office in support of farmers and against C-A-A

अँड. तोसिफ शेख म्हणाले कि एक राजा होता शेतकर्‍यांच्या मिरचीच्या च्या देठाला हात लावणार्‍याचे हात कलम केली जातील अशी ताकीद देणारा तो म्हणजे छत्रपती कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज,

Advertisement

इवीएम मध्ये फेरफार करून जनतेच्या डोळ्यात धूळ घालून केंद्राचे सिंहासन मिळवणारा एक मूर्ख चौकीदार!

लाचार बनवणारे कायदे परस्पर पास करून अम्बानी ,अदानी चे आणि बड्या उद्योगपतींची घर भरणारा.

भारत हा कृषि प्रधान देश आहे कारण इथला शेतकरी स्वतः साठी नाही तर देशासाठी मातीत बीज गाडून, कष्टांच्या घामाने सर्व पिकवतो.

Advertisement

कष्टाने पिकवलेल्या अन्नावर त्याचा हक्क काढून घेणारा काळा कायदा भारतीय शेतकर्‍यावर लादला गेला म्हणत यावेळी या काळ्या कायद्याच्या प्रति जाळण्यात आल्या.

Advertisement

“लोकशाही मध्ये हुकुमशाही चालणार नाही हा देश संविधानवर चालतो, संघी विचारसरणीवर नाही.” असेही अँड. तोसिफ शेख म्हणाले .

“आज शेतकरीविरोधी निर्माण झालेले काळे कायदे जाळले गेले येणाऱ्या काळात असे कायदे बनवलेले हात जाळले जातील” – असे अ‍ॅड क्रांती सहाणे म्हणाले .

“देशाला धोका परदेशातील शक्तींपासून नसून आपल्या देशातील रंगा बिल्ला या जोडीपासून आहे असे”RPI (I) चे अध्यक्ष सतीश गायकवाड म्हणाले ,

यावेळी संभाजी ब्रिगेड, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, शेतकरी संघटना, भीम छावा संघटना, छावा संघटना,

Advertisement

मराठा युवा क्रांती दल, मास मूव्हमेंट,इत्यादी सर्व बहुजन संघटना या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

2 thoughts on “शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व सी ए ए च्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर rpi(i)चा मोर्चा.

Comments are closed.