ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला 5 लाखाच्या खंडणी मागणारे पोलिसांच्या जाळ्यात

Advertisement

(5 lakh ransom demand) 4 लाख रुपये घेताना खंडणी विरोधी पथकानं रंगेहाथ तिघांना पकडलं

sajag nagrik times : (5 lakh ransom demand) पिसोळी येथील प्लॉटवर टाकलेला राडा रोडा उचलण्यासाठी

फिर्यादी जुबेर बाबू शेख यांना ४ लाख रुपयांची खंडणी मागून ती घेत असताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून त्या तिघांना  रंगेहाथ  पकडले.

गणेश जगताप ( वय २८ , रा . महम्मदवाडी , हडपसर ) अमर अबनावे ( वय २ ९ रा . उरळी देवाची )

दीपक विजय निंबाळकर ( वय २ ९ , रा . निंबाळकरवस्ती , पिसोळी , ता . हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .

याप्रकरणी जुबेर बाबु शेख ( वय ४१ , रा . भवानी पेठ, कासेवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी जुबेर बाबू शेख यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.

जुबेर बाबू शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस आहेत.

जुबेर बाबू शेख यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत .

Advertisement

मिळकतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिपक निंबाळकर याने राडारोडा टाकला होता .

तो राडारोडा उचलण्यासाठी जुबेर बाबू शेख व त्यांचा मित्र सचिन ननावरे यांनी फोन करुन सांगितले.

हा राडारोडा उचलण्यासाठी दीपक निंबाळकर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी जुबेर बाबू शेख यांच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी केली .

शेख यांना पैसे घेऊन कोंढवा कात्रज रोडवरील कान्हा हॉटेल मध्ये बोलावले.

जुबेर बाबू शेख यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली .

सोमवारी दुपारी जुबेर बाबू शेख हे ४ लाख रुपये घेऊन कान्हा हॉटेल येथे पोहोचले.

जुबेर बाबू शेख यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी त्या तीन खंडणी बहाद्दरांना सापळा रचून पकडले.

सदरील प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.

Share Now

One thought on “राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला 5 लाखाच्या खंडणी मागणारे पोलिसांच्या जाळ्यात

Comments are closed.