Homeताज्या घडामोडीराष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप विरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप विरोधात गुन्हा दाखल

(corporator Subhash Jagtap) सहकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

(corporator Subhash Jagtap) sajag nagrik times; प्रतिनिधी.

पुणे : सहकारनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे .

नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सदरील घटना ही सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पद्मावतीमध्ये तळजाई वसाहतीत शुक्रवारी रात्री घडली होती.

दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी राष्ट्रवादी चे नगरसेवक सुभाष जगताप तसेच एका टेम्पोचालकाविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला 5 लाखाच्या खंडणी मागणारे पोलिसांच्या जाळ्यात

थेट नगरसेवकाला जबाबदार धरल्याने पुणेकरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

प्रांजल विजय आदमाने (वय ६वर्ष) सौरभ जालिंदर पाटोळे (वय ७ वर्ष ) अनुष्का विशाल रणदिवे (वय ६ वर्ष),सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

यासंदर्भात पोलीस अमंलदार संतोष कराड यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तळजाई वसाहतीत एका सिनेमाच्या प्रदर्शनासाठी इलेक्ट्रॉनिक पडदा लावण्यात आला होता.

पडद्याला विद्युत पुरवठा करण्यासाठी एका रोहित्रातून बेकायदा वीजजोड घेण्यात आली होती.

एका टेम्पोने पडद्याला धडक दिली त्यानंतर पडदा खाली कोसळला.

यामुळे पडद्याच्या समोर बसलेली ३ लहान मुले जखमी झाली.

जखमींपैकी एका लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली .

सदरील प्रकरणाचा तपास हे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण करीत आहेत.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular