Sajag Nagrikk Times:क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन पुणे शहर यांच्या वतीने प्रथमच पुण्यात काशिवाडी या भागामध्ये मुस्लिम महिला भगिनीसाठी रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या देशाचे संविधान ज्या चार प्रमुख तत्वांवर आहे त्यातील एक म्हणजे “समानता”, आज आपल्या राज्यात अनेक रोजा इफ्तार चे कार्यक्रम आयोजित केले जातात, यामध्ये महिलांचा सहभाग अत्यंत अल्प असतो, त्यामुळे महिलांसाठी देखील हा उपक्रम राबवून एक दिवस त्यांना देखील इफ्तार ची दावत देण्यात यावी या भावनेतून हा कार्यक्रम बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्रातील हा पहिला कार्यक्रम आहे जो फक्त महिलांसाठीच आयोजित केला होता असे आयोजकांनी सांगितले.
या वेळी प्रमुख उपस्थिती माजी गृह राज्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेशदादा बागवे,काशिवाडी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक,मिठगंज पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक सौ गिरीजा म्हस्के व सौ इंदिराताई अविनाश बागवे उपस्थित होते..
या कार्यक्रमाचे आयोजन मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सौ सुरेखा ताई खंडाळे व पुणे शहर मातंग एकता आंदोलनचे महिला अध्यक्षा सौ.राजश्रीताई अडसूळ हे होते.
या कार्यक्रमाला प्रभाग क्र. १९ मधील मुस्लिम भगिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महिला पदाधिकारी भगिंनी,जायेदा शेख, राजखाला शेख,हमीदा शेख., सिंधुताई गायकवाड, पारुताई दहातोंडे, संगिताताई आरडे,रेश्मा हुसेन शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.