Homeताज्या घडामोडीदहा हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी ग्रामसेवक अँटी करप्शन च्या जाळ्यात.

दहा हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी ग्रामसेवक अँटी करप्शन च्या जाळ्यात.

Sajag Nagrikk Times:तक्रारदार यानी त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या जागेवर पत्र्याचे शेडची नोंद ग्रामपंचायत खडकाळे कामशेत येथे करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी लोकसेवक विलास काळे यांची भेट घेतली होती.

लोकसेवक विलास काळे यानी ८ अ उता – यावर नोंद करण्यासाठी १२,००० / – रुपये लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत.प्र.विभाग. पुणे येथे दिली होती .

सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांचे आईचे नावे नोंद करुन देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विलास काळे यानी तक्रारदारांकडे १२,००० / – रुपयांची लाच मागणी करुन त्यातील १०००० रूपये स्वीकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून , कामशेत पोलीस स्टेशन , पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे .

ला . प्र . वि . पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे , ला.प्र . वि . पुणे परिक्षेत्र , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली .

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments