ताज्या घडामोडी

कोट्यावधीची वक्फ जमीन मोबदला घोटाळ्यातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

Advertisement

( Waqf land ) सरकारी वकील ऍड. गेहलोत व महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे विशेष वकील ऍड. समीर शेख यांनी बाजू मांडली,

पुणे :हिंजेवाडी माण येथील राजीव गांधी इन्फोटेक साठी अधिग्रहण करण्यात आलेल्या जमीनीचा मोबदला संदर्भातील गैरव्यवहारातील एक आरोपी चांद रमजान शेख याचा जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

सुमारे 9 कोटी 64 लाख रुपये मोबदला मिळणार असलेल्या वक्फ संस्थेचे ट्रस्टी असल्याचे खोटे सांगून तसेच पुराव्या दाखल वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत पत्र सादर करणाऱ्या आणि त्यापैकी सुमारे 8 कोटींपेक्षा अधिक रक्कम परस्पर हस्तांतरित करणाऱ्या इम्तियाज शेख तसेच चांद मुलाणी तसेच इतर या आरोपीं पैकी चांद मुलाणी याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतांना वक्फ मंडळाला या कामी तक्रार करण्याचा हक्कच नसल्याने जामीन व्हावा असा बचाव घेतला होता.

Advertisement

न्यायालयाने त्याचे म्हणणे फेटाळून लावत सरकारी वकील ऍड. गेहलोत व मूळ फिर्यादी असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे विशेष वकील ऍड. समीर शेख यांचे म्हणणे मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

यातील सुमारे 90% पेक्षा अधिक रक्कम बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी व त्यांच्या टीम मधील अधिकारी व पोलिसांनी आतापर्यंत वसुल करून बँकेत जमा केल्याने पोलिसांचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर घोटाळा हा मोठ्या स्वरूपाचा घोटाळा असल्याची चर्चा असून या मागचे मोठे धेंड बाहेर आले पाहीजे अशी मागणी जनतेतून होत आहे.

वाचा : पुणे कॅम्प परिसरातील दिल्ली दरबार, सुजाता मस्तानी, शेगाव कचोरीवर सील बंद ची कारवाई

Share Now

2 thoughts on “कोट्यावधीची वक्फ जमीन मोबदला घोटाळ्यातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

Comments are closed.