( Delhi Darbar , Sujata Mastani , Shegaon Kachori Seal ) पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने केली ही कारवाई
(Delhi Darbar , Sujata Mastani , Shegaon Kachori Seal ) Pune Camp |
व्यापार परवाना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल दिल्ली दरबार ,शेगाव कचोरी ,आणि सुजाता मस्तानी, हे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने सील केले आहेत.
सदरील कारवाई ही पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने शुक्रवारी (दि.17) केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले की,
कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार अनिवार्य व्यापार परवाना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरोग्य विभागाने या अस्थापना सील केल्या असून पुढील आदेश येईपर्यंत या अस्थापना बंद राहणार आहेत.
वाचा : कोंढवा लुल्लानगर चौकात साचलेल्या पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करुन देताना वाहतुक पोलिस
पुणे कॅन्टोन्मेंट भागात तब्बल 700 दुकाने विनापरवाना सुरु असून, चालकांनी परवाना घ्यावा, यासाठी व्यापाऱ्यांना मुदत देण्यात आली होती.
मात्र, याला व्यापाऱ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांना परवाना घेण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई सुरु केली आहे.
शुक्रवारी प्रसिद्ध हॉटेलसह दोन दुकाने सील करण्यात आली आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख आर.टी. शेख यांनी सांगितले की, पुलगेट परिसरातील प्रसिद्ध सुजाता मस्तानी ,
शेगाव कचोरी, आणि अरोरो टॉवरच्या मागे असलेले दिल्ली दरबार हॉटेल सील करण्यात आले आहे.
कारवाई करण्यात आलेल्यांकडून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
यापुढेही दहा दिवस ही कारवाई सुरु राहणार असल्याचे शेख सांगितले .