AIMIMचे नगरसेविका आश्विनीताई लांडगे यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
Sajag Nagrikk Times :AIMIM help: दि. ५/८/२०१९ रोजी येरवडा येथील ताडी गुत्ता नदीपात्रातील रहीवासी यांना नगरसेविका आश्विनीताई लांडगे यांच्या वतीने पुराची पुर्व सुचना देण्यात आली होती .
तसेच मुळा-मुठा नदीतील पाणी मुसळधार पाऊस वाढल्यामुळे तेथील नागरिकांच्या घरात नदीचे पाणी आल्याने त्यांच्या राहण्याची व निवाऱ्याची सोय मदर तेरेसा हाॅल
येथील रात्र निवारा प्रकल्पात आणि कर्नल यंग प्राथमिक विद्यालय येथे येरवड्याचे AIMIMचे नगरसेविका आश्विनीताई डॅनियल लांडगे यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व पुणे शहराचे AIMIM पक्षाचे नेते डॅनियल लांडगे आणि AIMIM पक्षाचे पुणे शहर कार्याध्यक्ष शैलेंद्र भोसले
यांनी तेथील नागरिकांना तेथे स्थलांतर करून त्यांना भेट देऊन त्यांची विचारपुस करून त्यांच्या जेवणाची तसेच चहा,नाष्टा व पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली.
त्याचप्रमाणे डॉक्टरांना सांगून त्यांना मोफत औषध गोळ्या ही उपलब्ध करूण देण्यास सांगितले. यावेळी AIMIM चे कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न करून नागरिकांना सहकार्य केले.
त्याबद्दल तेथील नागरीकांनी नगरसेविका आश्विनीताई लांडगे,डॅनियल लांडगे व भोजन बनवण्याची जबाबदारी घेणारे वसिम मोला शेख आणि सर्व AIMIMचे कार्यकर्ते यांचे आभार मानले.
हेपण वाचा पूरग्रस्त बांधवाना सुका शिधा,कपडे व ब्लॅंकेटची मदत(Help) नाल्यात बुडालेल्या युवकास अग्निशमन दलाकडून जीवदान महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढव्यातील मौलानाला(molana) एका वर्षाची शिक्षा