महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढव्यातील मौलानाला (molana)एका वर्षाची शिक्षा
Molana News : पुणे ;महिलेवर पाळत ठेवून तिची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या मन्सूर चंदुलाल इनामदार (वय 38 राहणार अश्रफ नगर कोंढवा, मूळ राहणार फलटण)
या मौलानाला लष्कर न्यायालयाने एक वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे ,
हेपण वाचा : नाल्यात बुडालेल्या युवकास अग्निशमन दलाकडून जीवदान
सदरील कारवाई ही लष्कर न्यायालयाचे न्यायाधीश देशपांडे यांनी केली , इनामदार यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये एका महिलेचा पाटलाग करून तिच्या घरावर पाळत ठेवली होती,
तसेच तिची सोशल मीडियावर बदनामी केली होती ,या प्रकरणी एका पीडित महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती,
पोलिसांनी मौलानावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याच्या विरुद्ध लष्कर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते,
सदरील खटल्यात सहायक सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि वाघमारे यांनी काम पाहिले.
हेपण वाचा : कोंढव्यातील जशन व सुफी हाॅटेलवर पोलिसांची कारवाई