Create by : पतंगे वाड्यातील शिवशक्ती तरुण मंडळाच्या बालचमूंनी ” प्रतापगड ” साकारला.

सजग नागरिक टाइम्स प्रतिनिधि :Create by:पुणे लष्कर भागातील सेंटर स्ट्रीटवरील पतंगे वाड्यातील शिवशक्ती तरुण मंडळाच्या बालचमूंनी ” प्रतापगड (Pratapgad killa) ” साकारला.
या किल्ल्यावर डोमाने फडकाविणारा महाराष्ट्राचा भगवा ध्वज आकर्षक दिसत आहे.
या किल्ल्यावर चोरवाटा,भुयारे,रस्त्यांची वळणे,नाकेबंदी,शत्रूवर मारा करणाऱ्या जागा,तटबंदी,गडाचे वैभव,दरवाज्याची भव्यता,
मंदिरे साकारली आहेत.या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मांडण्यात आला.
हेपण वाचा : पुणे ; 123 तोळे सोने चोरणाऱ्यास राजस्थान मधून केली अटक
तसेच तानाजी मालुसरे,शेतकरी,शिपाई,मंदिर,नगरावाला,धनगर,ब्राम्हण,
सेवक , भाजीवाला,गवळण,शंकराचे केदारेश्वर मंदिर,प्राणी,तोफ,तलाव आणि पहारेकरी अशी चित्रे मंडळी आहेत .
या किल्ल्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दाखवून दिला आहे . बालचमूंनी आपला जीव ओतून हा “प्रतापगड “अप्रतिम सादर केला आहे .
यासाठी शिवशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष अंकित परदेशी , विनय भगत , आशिष गावडे , सुनील भगत , शुभम परदेशी , लखन खैरे ,
करण वाघचौडे , ओंकार गावडे , चैतन्य तापसे , वरूण शहा , प्रथम रोकडे , यश व्हावळ , गौरव साळवी , आर्यन चानपुरा , शुभम सारथे आदींनी परिश्रम घेतले .
रिलेटेड बातमी : दिवाळी पाडव्यानिमित्त विविध संस्थांनी सारसबागेत केला कचरा ; सामर्थ्य प्रबोधिनीने केले साफ
सजग नागरिक टाइम्स: Diwali :पुणे शहरातील सारसबागेत २०/१०/२०१७ रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त सालाबादप्रमाणे विविध संस्थांनी अनेक नाना विविध कार्यक्रम आयोजित केले होते,
त्याला शहर आणि उपनगरातून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पणत्या,फटाके,चिनी आकाशदिवे या माध्यमातून लोंकानी हा उत्सव साजरा केला.
परंतु हे करत असताना त्यांना सामाजिक भान नव्हते कि आपण किती मोठ्या प्रमाणात कचरा करत आहोत.
जशी-जशी सकाळची वेळ सारत गेली,सारसबाग परिसरात कचऱ्याचे ढीग साचत गेले.
हेपण वाचा:घरफोडी करून 4 लाख ५० हजार रुपयेचे दागिने व रोकड पळविले
महानगरपालिका प्रशासनाने चिनी आकाशदिव्याना,फटाक्यांना बंदी केली असताना नागरिकांनी सरासपणे त्याचा वापर केला,
अनेक ठिकाणी झाडांना हे दिवे लटकत असल्याचे चित्र दिसत होते, अनेक पक्षी जखमी झालेले आढळले .
सामर्थ्य प्रबोधिनीच्या माध्यमातून सलग दुसर्या वर्षी स्वछता मोहीम घेण्यात आली,तसेच कार्याकार्त्यां सोबतच अनेक नागरिकांनी स्वयंमस्फूर्तीने स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला,
कार्यकर्त्यांनी सरसबागेचे विविध भाग वाटून घेऊन स्वछ केले.सामर्थ्य प्रबोधिनीचे अध्यक्ष सुशांत भिसे यांनी सांगितले कि ,
पुढील वर्षी असे सांकृतिक कार्यक्रम रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पर्यावरण आणि लॉनमध्ये होणारी नासाडी रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.अधिक वाचा