सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे, चोरीचे 27 गुन्हे उघड

सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे, चोरीचे 27 गुन्हे उघड (police news today)

Pune police news today 27 crime open of burglary robbery revealed criminal

Pune police news today :सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे, चोरीचे 27 गुन्हे उघड : 23 लाख 27 हजाराचा ऐवज हस्तगत

पुणे:डॉ. के.वेंकटेशं पोलीस आयुक्त पुणे शहर व रवींद्र शिसवे पोलीस सह.आयुक्त पुणे यांनी पुणे शहरामध्ये घरफोडी व इतर चोरीचे गुन्हे घडू नये,

व मालमत्तेच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी पोलिस अभिलेखा वरील गुन्हेगारांचे हालचालीवर नजर ठेवून,

Advertisement

त्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी आदेश दिलेले आहेत.तसेच क्रिप्स सारख्या योजना राबवल्या जात आहेत,

हायप्रोफाईल मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा

गुन्हे शाखा युनिट 3 पुणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांना चेक करत असताना

दिनांक 14 7 2019 रोजी पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर व अतुल साठे यांना त्यांचे खात्याकडून मिळालेल्या बातमीवरून

Advertisement

रामटेकडी हडपसर परिसरात सापळा लावून पोलीस अभिलेखा वरील घरफोडी, चोऱ्या करणारे गुन्हेगार

1) जीत सिंग उर्फ जितू राजपाल सिंग टाक वय.23. राहणार वैदवाडी, बिराजदार नगर खोली नंबर 5 पुणे ,

२) हुकूमसिंग रामसिंग कल्याणी वय-28 वर्षे राहणार-कोठारी शोरूम चे बाजूला रामटेकडी हडपसर पुणे

Advertisement

३) अंगतसिंग अजमेरसिंग कल्याणी वय-34 वर्षे, राहणार कोठारी शोरूम चे बाजूला रामटेकडी हडपसर पुणे,यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी त्यांचे साथीदार लखनसिंग राजपूत दुधाणी

यांच्यासह पुणे शहरामध्ये मागील दीड वर्षापासून घरफोडी, चोऱ्या करत असल्याचे सांगितले आहे,

Advertisement

विनय प्रमोद खाडे प्रसन्न श्री अपार्टमेंट आयडियल कॉलोनी कोथरूड पुणे,

यांचे घर बंद असताना रात्रीच्या वेळेस आरोपींनी दरवाज्याचे कडी कापून घरात प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने चोरल्याची उघडकीस आले आहे,

आरोपीकडून आतापर्यंत एकूण 470 gm (47तोळे) वजनाचे सोन्याचे व 4080 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने,

Advertisement

एक कार, एक मोटारसायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे दोन कटावणी, एक बोल्ट कटर,

दोन स्क्रू ड्रायव्हर, असा एकूण 23 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे,

आरोपींनी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील सोसायट्यांमधील बंद घर फोडून घरफोड्या केल्या आहेत.

Advertisement

त्यांच्याकडून पुढील प्रमाणे पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आलेले आहेत कोथरूड 12, सिंहगड रोड 5, 3 भारती विद्यापीठ,

दत्तवाडी 1, मुंडवा २,डेक्कन1,हवेली1, स्वारगेट1,असे एकूण सत्तावीस दाखल गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत.

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढव्यातील मौलानाला(molana) एका वर्षाची शिक्षा

आरोपींकडून पुणे शहर व परिसरात घरफोडी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे

Advertisement

याबाबत पोलीस तपास करत आहेत माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिका री न्यायालय क्रमांक 1 पुणे

यांचे न्यायालयात आरोपींना हजर केले असता त्यांना दिनांक 22 /8/ 2019 रोजी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Pune-police-news today-27-crime-open-of-burglary-robbery-revealed-criminal

आरोपी वरहापालन व लोखंडी हत्यारे बनवण्याचा व्यवसाय वरकरणी करतात,

Advertisement

आरोपी जितसिंग टाक याचे विरुद्ध डेक्कन व हडपसर पोलीस स्टेशन येथे घरफोडी व इतर चोरीचे दोन असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.

हुकूमसिंग याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी, व खुणाचा प्रयत्न प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गुन्हे दाखल आहे.

यातील फरार आरोपी नामे लखन सिंग याच्यावर यापूर्वी चे 9 घरफोडी 2 चोरी असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

जीतसिंग हा आरोपी दहावीपर्यंत शिक्षण झालेला आहे, इतर तीन आरोपींचे चौथी ते पाचवीपर्यंत शिक्षण झालेले आहे,

Pune police news : वानवडी वाहतूक पोलिसांनी(TRAFFICE POLICE ) जीवावर खेळून जप्त केले हत्यार व वाहन

सदर कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर बच्चन सिंग,

सहायक पोलिस आयुक्त गुन्हे पुणे डॉ. शिवाजी पवार, यांच्या मार्गदर्श नाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,

Advertisement

पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण आडगलळे,राजकुमार केंद्रे व गुन्हे युनिट-3 पथकातील पोलिस कर्मचारी संतोष क्षीरसागर,

प्रवीण तापकीर, संदीप तळेकर, अतुल साठे, अनिल शिंदे, संदीप राठोड, रोहिदास लवांडे, शकील शेख,

राहुल घाडगे, दत्तात्रय गरुड, दीपक मते, किशोर शिंदे, रामदास गोणते, सचिन गायकवाड, गजानन गणबोटे, कैलास साळुंखे,

Advertisement

कल्पेश बनसोडे, विल्सन डिसोजा यांनी केली आहे,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement
telegram