Homeताज्या घडामोडीjournalist ला मारहाण करणाऱ्या शोएब इनामदार, चांद शेखला वानवडी पोलीसांकडून अटक

journalist ला मारहाण करणाऱ्या शोएब इनामदार, चांद शेखला वानवडी पोलीसांकडून अटक

Shoaib Inamdar Chand Shaikh, was assaulting the journalist

सनाटा प्रतिनिधी पुणे,  पुणे हडपसर गुलाम अलीनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या 5 शांळा मध्ये चालत असलेले अनागोंदी कारभार journalist मजहर खान यांनी बाहेर चव्हाट्यावर आणल्याने

व त्याची शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिकाकडून चौकशी बसल्याने त्याचा राग मनात धरून   सजग नागरिक टाईम्स चे संपादक मजहर खान यांना

बंदुकीच्या जोरावर अपहरण करून 8 ऑक्टोबर 2018 रोजी अमानुषपणे मारहाण करून जखमी केले होते.

त्या प्रकरणात आयडियल एज्युकेशन ट्रस्टचा संचालक शफि यासीन इनामदार, फहिम शफि इनामदार, मुसददीक शफि इनामदार, यांच्यावर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आणि त्या प्रकरणात (journalist)मजहर खान यांच्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस स्टेशनकडून तपास करण्यात येत होता.

खान यांनी दिलेल्या माहितीनुसार  तपासात आणखीन नाव पुढे आल्याने पोलीसांनी शोएब शफी इनामदार, चांद शरीफ शेख,बाळू मनोरे, यांची चौकशी सुरू केली होती .

त्या चौकशीत शोएब इनामदार, चांद शेख,बाळू मनोरे, नावे निषपन्न झाल्याने पोलीसांनी शेवटी शोएब शफी इनामदार, चांद शरीफ शेख,

यांना आज रोजी 14 जानेवारी 2019 रोजी अटक करून लष्कर कोर्टात हजर केले. बाळू मनोरे हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पुढील तपास वानवडी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक आसाराम शेटे करत आहेत 

(journalist)पत्रकारांना मारहाण होणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला करणे होय, पोलीस जर पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या  आरोपींना अटक करण्यासाठी तीन तीन महिने लावत असतील तर मग सर्व सामान्यांचे काय हाल होत असतील अश्या प्रतिक्रिया पुणे शहरात उमटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular