Homeताज्या घडामोडीसलग 11 वेळा महाराष्ट्र विधानसभाचे सदस्य असलेले शेकाप चे माजी आमदार गणपतराव...

सलग 11 वेळा महाराष्ट्र विधानसभाचे सदस्य असलेले शेकाप चे माजी आमदार गणपतराव देशमुख याचे निधन

(MLA Ganpatrao Deshmukh) २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

(MLA Ganpatrao Deshmukh) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :  सलग ११ वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असलेले,

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले ते ९५ वर्षांचे होते.

देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११वेळा विक्रमी विजय मिळविला आहे.

video पहा : पुण्यात DCP ला फुकटची Biryani पडली महागात ? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले चौकशीचे आदेश|

२००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

यंदाच्या निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला.

देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले.

त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली.

२०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते,

मात्र १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

वाचा : DCP मॅडमला बिर्याणी खायचीय तेही फुकटात ? गृहमंत्र्यांनी दिले चौकशी चे आदेश

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular