(3 contractors blacklisted ) ठेकेदारांवर कारवाई मात्र अधिका-यांचे काय?
(3 contractors blacklisted ) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अनेक अनागोंदी कारभार सजग नागरिक टाईम्सने वारंवार उघडकीस आणले आहे.
काम न करताच ठेकेदाराला बिले अदा केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
कामे न करताच बिले अदा करणारे अधिकारी- कर्मचारी आणि ठेकेदार मिळून पुणे महानगर पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालत आहे?
एखादे प्रकरण अंगलट येऊ लागले की मग आमच्यावर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात भरपूर दबाव आणला जात असल्याचा डंका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पिटला जातो.
परंतु स्वत केलेल्या चुकांमुळे प्रकरणे बाहेर पडतात हे कबुल करायला अधिकारी व कर्मचारी तयार नाहीत.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
कामे कमी आणि त्याची बिले अधिकच्या रकमेने लाटल्याप्रकरणी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील ३ ठेकेदार कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
यात १) मे. रेणुका एंटरप्रायझेस प्रो. विक्रम सुभाष खेनट ( कसबा पेठ)
२) मे. गणेश प्रोपरायटर प्रो. नरेंद्र कच्छावे( भवानी पेठ) ३) मे. सद्गुरू एंटरप्रायझेस प्रो. राहुल अनिल मोहिते ( काशेवाडी भवानी पेठ) अशी या तीन ठेकेदार कंपन्यांची नावे आहेत.
वाचा : भवानी पेठेतील हॉटेल चालकाला तब्बल १ लाखाचा दंड,
ठेकेदारांनी केलेल्या घोळ मध्ये अधिकारी व कर्मचारी देखील सामिल असूनही त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही ?
तर त्यांचे नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने संशयाची सुई वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई कडे फिरत आहे.
तसेच २ फाईली गायब असताना देखील वरिष्ठांनी पोलीस ठाण्यात फिर्याद का दिली नाही अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
तर फाईल गायब कोणी व का केली याचा उलगडा झालेला नाही.
आणि त्या फाईल गायब प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे किंवा नाही याची माहिती अधिका-यांनी दिलेली नाही.
महापालिका प्रशासनाने तपासणी केली असताना अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे.
त्यात जागेवर काम कमी केले असतानाही संबंधित ठेकेदारांना जादा बिल अदा करणे, एकच कामासाठी दोनदा निधी खर्च करणे असे अनेक प्रकार तपासणीत आढळून आले होते.
अखेर प्रशासनाने या प्रकरणी ३ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी कारवाई केली आहे.
प्रत्यक्ष काम न करताच शंभर टक्के बिल अदा करण्यात आली या प्रकरणात ठेकेदार एकटाच नसून यात क्षेत्रिय अधिकारी ,
ज्युनिअर इंजिनिअर व उप अभियंता देखील सामिल आहेत मग त्यांच्यावर कारवाई का नाही? अशी चर्चा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सुरू आहे.
कामे न करताच बिले पास झाल्याने पुणे महानगर पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
video पहा : DCP ला फुकटची Biryani पडली महागात ? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले चौकशीचे आदेश|