ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

कामे न करता बिले काढल्या प्रकरणी भवानी पेठेतील उपअभियंता टूले निलंबित तर कनिष्ठ अभियंत्याची खातेनिहाय चौकशी शुरू

Advertisement

(Deputy Engineer Toole) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अनेक अनागोंदी कारभार सजग नागरिक टाईम्सने वारंवार उघडकीस आणले आहे.

काम न करताच ठेकेदाराला बिले अदा केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

कामे न करताच बिले अदा करणारे अधिकारी- कर्मचारी आणि ठेकेदार मिळून पुणे महानगर पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालत आहे.

स्वत केलेल्या चुकांमुळे प्रकरणे बाहेर पडतात हे कबुल करायला अधिकारी व कर्मचारी तयार नाहीत.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

पादचारी मार्गाची दुरुस्ती,कॉन्क्रिटीकरण करणे,व इतर कामात गैरप्रकार झाला असल्याची तक्रार करण्यात आली होती.

त्याची चौकशी करण्यात आली व ही मंडळी दोषी निघाली.

कामे कमी आणि त्याची बिले अधिकच्या रकमेने लाटल्याप्रकरणी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील ३ ठेकेदार कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

Advertisement

वाचा : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील ३ ठेकेदार काळया यादीत, उपायुक्तांनी केली कारवाई.

यात १) मे. रेणुका एंटरप्रायझेस प्रो. विक्रम सुभाष खेनट ( कसबा पेठ)

२) मे. गणेश प्रोपरायटर प्रो. नरेंद्र कच्छावे(भवानी पेठ)

३) मे. सद्गुरू एंटरप्रायझेस प्रो. राहुल अनिल मोहिते ( काशेवाडी भवानी पेठ) अशी या तीन ठेकेदार कंपन्यांची नावे आहेत.

ठेकेदारांनी केलेल्या घोळ मध्ये अधिकारी व कर्मचारी देखील सामिल असून त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात आली आहे.

उपभियंता बाळासाहेब टूले यांना निलंबित करण्यात आले असून कनिष्ठ अभियंता सिमरन पिरजादे यांची खातेनिहाय चौकशी शुरू आहे.

तसेच २ फाईली गायब झाली असल्याने त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिले असून लवकरच त्याचा ही उलगडा होईल अशी माहिती उपायुक्त सपकाळ यांनी दिली आहे.

वाचा : फिर्यादीला पोलिसांनीच गंडविलायाची न्यायालयात तक्रार !

Share Now