मनसे पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे सहित 9 जणांन विरोधात एफआयआर दाखल

fir filed against mns workers : घुसखोरांचा शोध मनसेच्या अंगलट ?

fir filed against mns workers in pune
स्पेशल ब्रांच डीसीपी मीतेश गीते यांना निवेदन देताना शिष्टमंडळ

Fir filed against mns workers : सजग नागरिक टाइम्स : पुण्यात 22 फेब्रुवारी रोजी मनसे च्या वतीने बांगलादेशी हटाव मोहिम राबविण्यात आली होती,

या मोहिमेत मनसे कार्यकर्त्यान सोबत पोलीस अधिकारी कर्मचारी काही न्यूज चायनल वाले होते.

सदरील मोहीम राबविताना मनसेच्या काही उतावीळ कार्यकर्त्यांनी त्या मुस्लीम परिवाराला बांगलादेशी म्हणून त्यांना धमकावले ,

Advertisement

तुम्ही बांगलादेशी आहात तुम्हाला येथे राहण्याचा अधिकार नाही , तुमची कागदपत्रे दाखवा , असे म्हणून त्यांना घाबरवून सोडले व त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले ,

सर्वधर्मियांनी मिळून केली शिवजयंती साजरी

सदरील प्रकरणाची चौकशी चालू असताना ब्रेकिंग न्यूज च्या हव्यासापोटी zee 24 तास सहित अनेक चायनल वाल्यांनी त्यांचे चेहरे दाखवून बातम्या चालविल्या कि धनकवडीत बांग्लादेशीना दणका ,

Advertisement

सदरील व्यक्ती बांग्लादेशी आहे कि नाही हे सिद्ध होण्या आधीच त्यांच्या माथ्यावर बांग्लादेशी असल्याचे कलंक लावण्यात आले होते,

सदरील प्रकरणाचा बारकाईने तपास करून पोलिसांनी त्या तीन परिवारांची सर्व कागदपत्रे तपासून त्यांना सायंकाळी सोडून दिले.

मनसेच्या या भूमिकेमुळे नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले , मनसेला नागरिकांचे पेपर तपासण्याचा अधिकार दिला कोणी ? मनसेची हि मोहीम एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचे प्रयत्न तर नाही ना ? बांगलादेशात फक्त मुस्लिमच राहतात का ? बांगलादेशातून फक्त मुस्लिमच भारतात घुसले का ? मुस्लिमेतर लोकांची तपासणी कशी करणार ? जे मनसेचे कार्यकर्ते बांगलादेशी घुसखोरांच्या आड नागरिकांची तपासणी करणार आहे अगोदर ते भारतीय असल्याचा त्यांनी शासनाकडून प्रमाणपत्र घ्यावे व ते कोनकोणती कागदपत्रे देऊन घेतले तेही नागरिकांसमोर उघड करावे ?

Advertisement

या मोहिमेचा त्या परिवाराला भयंकर मानसिक व शारीरिक त्रास झाला ,

सदरील पिडीत रोशन शेख व काही सामाजिक कार्यकर्ते हे सजग नागरिक टाइम्सच्या कार्यालयात आले व घडलेला सर्व प्रकार सांगितला,

या संदर्भात सजग नागरिक टाइम्सने सदरील पिडीत कुटुंबियांची व्यथा हि video बातमीच्या माध्यमातून जगासमोर आणले,

Advertisement

या नंतर पुण्यातील अनेक संघटना हे पिडीत व्यक्ती रोशन शेख याच्या पाठीशी उभे राहिले.

व अॅडव्होकेट तौसीफ शेख यांच्या सहकार्याने रोशन शेख ने 24 फेब्रुवारी रोजी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

शेख च्या फिर्यादि नंतर मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे ,सचिन काटकर सहित 8 जणानविरोधात 143, 147, 149, 448, 506, 37 (1) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले ,

यावेळी रोशन शेख सहित अॅडव्होकेट तोसिफ शेख, मूलनिवासी मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सतीश गायकवाड,

Advertisement

सुहास बनसोडे,अॅडव्होकेट क्रांती सहाने, साबीर सय्यद भारतीय महामोर्चा , न्यू तिरंगा फाउंडेशनचे अमजद शेख, झुबेर मेमन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

सदरील सर्व प्रकार हा राज ठाकरेंच्या भाषणानंतर घडल्याने मुख्य आरोपी राज ठाकरेंना करण्याची मागणी व काही कलम पोलिसांनी वगळल्याने अॅडव्होकेट तौसीफ शेख व पोलिसात वाद झाले,

या प्रकरणाची सखोल चौकशी करून कलम वाढ व्हावी म्हणून 25 फेब्रुवारी रोजी पुणे आयुक्त कार्यालयात स्पेशल ब्रांच डीसीपी मीतेश गीते यांना पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जाऊन भेटले,

Advertisement

याप्रसंगी अॅडव्होकेट तौसीफ शेख, मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, लोकहित फाउंडेशनचे मझहर खान,

अॅडव्होकेट क्रांती सहाने, भारतीय एकता महामोर्चा अध्यक्ष साबीर सय्यद,तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष जमीर मोमीन, अमजद शेख, झुबेर मेमन,

इत्यादि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले येथे हि न्याय मिळाले नाही तर न्यायालयात दाद मागू असे अॅडव्होकेट तौसीफ शेख यांनी सांगिलते.

Advertisement
telegram