ताज्या घडामोडीपुणे

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या दिव्या खाली अंधार!

Advertisement

सजग नागरिक टाइम्स : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या दारा बाहेरच भले मोठे खड्डे पडले आहेत .

सदरच्या रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ ही सतत सुरु असते.

पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचले की खड्डा आहे की नाही हे लक्षात येत नाही त्यामुळे कीरकोळ अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

येरवडा क्षेत्रीय कार्यालय हे जर दारासमोरील खड्डे बुजविण्यात अपयशी ठरत असतील तर पुर्ण प्रभागाची काय दुरावस्था झालेली असेल?.

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे असे सामाजिक करकर्ते एजाज खान यांनी संबंधित अधिकारी वैभव कडलख यांना सांगितले असुन प्रभागात सुधारना न झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

Advertisement
Share Now