ताज्या घडामोडी

महिलेवर अॅसिड हल्याची धमकी :रोहित टिळक प्रकरण

Advertisement

पुणे :अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवलेल्या पीडीत महिलेने आपल्यावर अॅसिड हल्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसांकडे केली आहे. सदर पिडीत महिला त्यांच्या मित्रा सोबत स्वताच्या कार ने बावधन येथून जात असताना उड्डाणपूल खाली दोन मोटर सायकलस्वारांनी आमच्या कार समोर त्यांची मोटर सायकल आडवी घालून अडवले व मोटर सायकल वर मागे बसलेल्या व्यक्तीने हिंदीत म्हणाले कि “ तुमने रोहित टिळक और उनके परिवार वालोंके खिलाफ जो कम्प्लेट दि है उसे वापस लो वरना ये बोटल मे जो अॅसिड है ओ पुरा तुम्हारे उपर डालेंगे .असे म्हणत त्याची पल्सर गाडी घेऊन पळून गेला . मी बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर माझे फोटो वाटसअप वर वायरल करून माझी बदनामी केल्याची हि तक्रार मी नोंदवली असल्याचे पिडीत महिलेने सांगितले  .  विश्रामबाग पोलिस ठाण्यात महिला अधिकारी नसल्याने पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडे सोपवण्यात आले आहे.महिला पोलिसाने फिरयाद घेण्या ऐवजी पुरुष अधिकाऱ्याने फिरयाद घेतली असून अॅड तौसीफ शेख यांनी नाराजी व्यक्त करून पुढील तपास पुणे पोलीस कमिशनर रश्मी शुक्ला यांनी करावा अशी मागणी केली आहे

Share Now

Leave a Reply