Homeताज्या घडामोडीहडपसर मधील एका एज्युकेशन ट्रस्टने कर्माचा-यांचे पीएफ बुडविल्या प्रकरणी पीएफ विभागाने केली...

हडपसर मधील एका एज्युकेशन ट्रस्टने कर्माचा-यांचे पीएफ बुडविल्या प्रकरणी पीएफ विभागाने केली लाखोंची वसुली.

PF Department : पुणे हडपसर सय्यदनगर मधील एका एज्युकेशन ट्रस्टने कर्माचा-यांचे पीएफ बुडविल्या प्रकरणी पीएफ विभागाने केली लाखोंची वसुली.

pf-department-collected-millions-rupees-for-education-trust

PF Department News : सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी, पुणे शहर हे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ह्या पुण्याची ओळख झालेली आहे,

या शहरात शिक्षण संस्था हि भरमसाठ झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्र हे आता बिझनेस स्वरूपात सुरू झाले आहे.

त्यात शिक्षकांची हि स्पर्धा वाढलेली आहे त्यात शिक्षण संस्थानी पगारावर ठेवलेल्या शिक्षकांना वेळेवर पगार न देणे,पगार कमी देणे,

पीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) न भरणे असे प्रकार करून मलिदा कसे जास्तीत जास्त लाटता येईल असे प्रकार काहि शिक्षण संस्था करत असल्याचे समोर येत आहे.

यातीलच एक प्रकार हडपसर सय्यदनगर मधील एका एज्युकेशन ट्रस्टचा समोर आला आहे , ट्रस्टच्या लहान मोठ्ठे असे मिळून 6 शाळा आहेत

त्या ट्रस्टच्या बरेच शासकीय चौकश्या ही सुरू असताना पुन्हा एकदा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.

हकीकत अशी कि या एज्युकेशन ट्रस्टच्या ज्या 6 शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये अंदाजे 61 पेक्षा जास्त शिक्षक,अधिकारी,कर्मचारी कामे करतात

ते काम करत असलेल्या मोबदल्यातून पीएफ भरणे सदरील संस्थेवर बंधनकारक होते , परंतु सदरील संस्थेने ते पीएफ न भरता लाटल्याची तक्रार करण्यात आली होती.

सर्वांना अचंभित करणारी बाब म्हणजे ट्रस्टमधील सदस्य व अध्यक्ष महाशय हे शिक्षक , उचशिक्षित लोक आहेत . यांनी घपले करण्याचेच उचशिक्षण घेतले असावे असे यांच्या वर्तणुकीतून दिसत आहे ? यापूर्वी हि यांचे अनेक गैरकारभार उघडकीस आले आहे.

त्या तक्रारीची दखल घेत कर्मचारी भविष्य निधी संगठण कार्यालयाने संबंधित एज्युकेशन ट्रस्टला कारणे दाखवा नोटीस बजावून

मार्च 2007 ते जुन 2019 पर्यंत कर्मचा-यांकडून वसुल करून हि न भरलेले पीएफ भरण्याचे आदेश दिले होते,

त्यामुळे या एज्युकेशन ट्रस्टने सदरील लाखो रूपयांची दाबलेली रक्कम भरून घेण्यात आल्याचे

सहाय्य भविष्य निधी आयुक्त क्षेत्रीय कार्यालय पुणे येथील एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे .

इतर बातमी : बाल हक्क संरक्षण आयोगाने आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळांचा मागविला चौकशी अहवाल

सजग नागरिक टाईम्स , प्रतिनिधी :January 5, 2020: पुणे हडपसर सय्यदनगर / गुलामअली नगर मधील अनधिकृत बांधकामे करून सदरील अनधिकृत इमारतीत शाळा सुरू आहे, अधिक वाचा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular