Child Rights Protection Commission : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आदेश
Child Rights Protection Commission : सजग नागरिक टाईम्स , प्रतिनिधी : पुणे हडपसर सय्यदनगर / गुलामअली नगर मधील अनधिकृत बांधकामे करून सदरील अनधिकृत इमारतीत शाळा सुरू आहे,
या अनधिकृत इमारतीच्या शाळेत शालेय विद्यार्थांचे जीव धोक्यात घालून राजरोसपणे शाळा चालविणा-या
आयडियल एज्युकेशन ट्रस्टला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने चांगलाच दणका दिला आहे.
हकीकत अशी कि आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित सर्व शाlळांचे बांधकाम अनधिकृत असल्याची बाब सजगचे अजहर खान यांनी उघडकीस आणून दिली होती
या बांधकामामुळे शालेय विद्यार्थींचे जीवतास हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,
संबंधीत बातमी : हडपसर:आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या भांडणात एकजण गंभीर!
व एखादे अपघात झाल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी पर्यायी जिन्याची व्यवस्था देखील नसल्याची
लेखी तक्रार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे केली होती.
खान यांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत बाल हक्क संरक्षण आयोगाने पुण्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग
यांना तातडीने चौकशी करून अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे आदेश डाॅ मंजूषा कुलकर्णी यांनी दिले आहेत.