ताज्या घडामोडी

जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी निर्भिड बनावे_ फिरोज मुल्ला.

Advertisement

Patrakar Din News : वृत्तपत्र मालक संपादक संघा तर्फे पुण्यात पत्रकार दीन साजरा.

pune-newspaper-malak-sampadak-sangh-celebrate-patrakar-din

Patrakar Din News : सजग नागरिक टाइम्स : बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी पुण्यातील मालधक्का चौकातिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पत्रकार दीन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते फेरोज मुल्ला हे उपस्थतीत होते.

वृत्तपत्र हे राजकीय पक्षाचे पॅकेज वर चालणारे नसावे भ्रष्ट नेत्यांवर लक्ष ठेऊन त्यांचे गैर कारभार बाहेर काढणारे असावे,

तळागाळातील जनसामाण्यांचे प्रश्न निर्भिडपणे मांडून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्भिड पत्रकारितेची आज नितांत गरज आहे.

असे स्पष्ट मतं जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डी. एस .ढोणे होते.

इतर बातमी : संविधानाच्या रक्षणासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा उभा करणार- आयपीएस अब्दुररहमान

Advertisement

वृत्तपत्राच्या समस्यांचे विवेचन वृत्तपत्र मालक संपादक संघाचे राज्याध्यक्ष डी एस ढोणे यांनी केले ,

लहान वृत्तपत्रांच्या समस्या सोडविण्यासाठी बाळ जांभेकर वृत्तपत्र कल्याण महामंडळ स्थापन करून त्या महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा द्यावा अशी मागणी हि केली.

यावेळी शहरातील काही वृत्तपत्रकार यांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक पुणे शहराचे अध्यक्ष सौरभ भंडारी यांनी केले तर समारोप राज्य कार्याध्यक्ष महेबूब सर्जेखान यांनी केले.

या समारंभास सजग नागरिक टाइम्स चे संपादक मजहर खान , माय मराठीचे अल्ताफ पिरजादे, मेरा भारत चे उस्मान काद्री ,रोजाना न्युज चे शोहेब अन्सारी ,

मजहर शेख व इतर वृत्तपत्राचे मालक, संपादक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपिस्थत होते.

इतर VIDEO बातमी : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर NRC / CAA च्या विरोधात बहूजन क्रांती मोर्चाची धडक

Share Now

One thought on “जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी निर्भिड बनावे_ फिरोज मुल्ला.

Comments are closed.