दिवाळीसाठी खंडणी मागणारा गजाआड(Dipawali)

Advertisement

दिवाळीसाठी खंडणी मागणा-यास समर्थ पोलिसांनी केली अटक (Dipawali)

police arrest seeking ransom for dipawali

सजग नागरिक टाइम्स : (Dipawali) पुणे शहरातील रास्तापेठ येथील अपोलो थेटर जवळील दुकानदारांना हप्ता मागणारा आरोपी नामे राहुल बाबुराव भाटी रा.सोमवार पेठ यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

सदरील प्रकार पुढील प्रमाणे २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता आरोपी व त्याचा एक साथीदार अपोलो थेटर जवळील इलेक्ट्रॉनिक दुकानात शिरला

व दुकानदारास दिवाळी साजरी करण्यासाठी धमकावून २०००० रुपये मागू लागला व न दिल्यास दुकान तोडफोड करीन असे म्हणून अंगावर धावून आला .

Advertisement

जानिए dj बंद जुलुस के मीटिंग में क्या हुवा

दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिल्याने दुकानातील एल इ डी टीव्ही जमिनीवर फेकून दिले व गल्ल्यातील ६००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले .

हे पाहून नागरिक मध्ये आल्याने त्याने सत्तूर बाहेर काढून सर्वांच्या अंगावर गेला व आरडाओरडा करून सर्वाना पळवून लावले व तेथून निघून गेला .

याची खबर पोलिसांना पडताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केले एक आरोपी अजूनही फरार आहे.

सदरील माहिती पोलिस उपनिरीक्षक एन आर शिरसाठ यांनी प्रेसनोट द्वारे दिली.

सारसबागेत झाड पडुन एकाच घरातील 5जण जखमी

Share Now

One thought on “दिवाळीसाठी खंडणी मागणारा गजाआड(Dipawali)

Leave a Reply