Homeताज्या घडामोडीहजरत सय्यद मोहम्मद साहब पाचपीर दर्गाहवर दीपोत्सव साजरा

हजरत सय्यद मोहम्मद साहब पाचपीर दर्गाहवर दीपोत्सव साजरा

हजरत सय्यद मोहम्मद साहब पाचपीर दर्गाहवर दीपोत्सव साजरा

celebrated Deep utsav Ha. Sayyed Mohammad Saheb Panchpiar Dargah
(celebrated Deep utsav):सजग नागरिक टाइम्स :पुणे लष्कर भागातील सोलापूर रोडवरील बंगला नंबर एकमधील हजरत सय्यद मोहम्मद साहब पाचपीर दर्गाहवर सर्व धर्मीय बांधवानी एकत्रित येऊन पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला .

या दीपोत्सव कार्यक्रमात पुणे लष्कर भागातील हिंदू – मुस्लिम – ख्रिचन बांधवानी एकत्रित येऊन हा दीपोत्सव साजरा केला .

दर्गाहमध्ये स्वस्तिक आणि ओम आकारामध्ये पणत्या ठेवण्यात आल्या होत्या . यावेळी सर्व बांधवाना दर्गाहचे खादिम जयकुमार राघवाचारी यांच्याहस्ते मिठाईवाटप करण्यात आली .

या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये राजा बडसल , ज्योती राघवाचारी , मधू राजा बडसल , गीता राघवाचारी , युगंधर बडसल , तन्वीर सय्यद व सुरज राघवाचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी दर्गाहचे खादिम जयकुमार राघवाचारी यांनी सांगितले कि , पुणे लष्कर परिसरात सर्व धर्मीय बांधव गुण्या गोविंदाने राहतात ,

त्यासाठी यंदाची दिवाळी आम्ही सर्वानी एकत्रित येऊन दर्गाहमध्ये दीपोत्सव साजरा केला(celebrated Deep utsav) . यावेळी आम्ही मिठाई वाटप करून दिवाळी आनंदाने साजरी केली असल्याची माहिती मिळाली .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular