ताज्या घडामोडीपुणेब्रेकिंग न्यूज

लॉकडाऊनच्या काळात पोलीसांनी धरू नये म्हणून बोगस आयकार्ड बनविण्याचा प्रकार.!

Advertisement

(making fake id card) लॉकडाऊनच्या काळात पुणे महानगर पालिकेने दिलेल्या आयकार्डचा गैरवापर.

(making fake id card ) कलर झेरॉक्स करून शासनाची केली जात आहे फसवणूक

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी : कोरोनाच्या काळात निधन झालेल्यांचे अंत्यविधीसाठी पुणे महानगर पालिकेने पुणे शहरातील काही सामाजिक संघटनांची नियुक्ती केली आहे.

 त्या सामाजिक संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मृत्यू पावलेल्या कोरोना रूग्णांवर अंत्यसंस्कार केले जात आहे.

त्यासाठी पुणे महानगर पालिकेतील आरोग्य विभागाने नाव नोंदणी केलेल्या सामाजिक संघटना व त्यांचे कार्यकर्त्यांना आयकार्ड दिले आहे.

 परंतु आरोग्य विभागाने दिलेल्या आयकार्डचा गैरवापर होताना दिसत आहे.

लॉकडाऊनच्या काळात पोलीसांनी धरू नये यासाठी काहींनी नामी शक्कल लढवली आहे.

वाचा : फडणवीसांनी दाखल केलेला दावा हा रिकामेपणाचा उद्योग : एड.सतीश उके, ऍड.समीर शेख,

 पोलिसांनी रस्त्यावर अडवू नये व दंडात्मक कारवाई करू नये यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या आयकार्ड सारखे हुबेहूब दिसणारे कलर झेरॉक्स काढून त्याचा गैरवापर केला जात असल्याचा प्रकार सजग च्या निर्दशनास आले आहे.

making fake id card so that the police do not catch them during lockdown!
कलर झेरॉक्स

 १८ मे रोजी सजग प्रतिनिधी कॅम्प परिसरातील एका झेरॉक्सच्या दुकानात झेरॉक्स घेत असताना आरोग्य विभागाने दिलेल्या आयकार्डचे शेकडो कलर झेरॉक्स पाहिले.

त्या कोऱ्या प्रिंटवर फोटो चिटकवून पेनने नावे लिहली जात असल्याचे निदर्शनास आले.

 त्यावर पुणे महानगर पालिकेचा लोगो व पुणे महानगर पालिकेतील आरोग्य विभागातील सहाय्यक आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत यांची सही दिसून आली,

 त्यावर संशय आल्याने त्या बाबतीत खातरजमा करण्यासाठी पुणे महानगर पालिकेतील आरोग्य विभागातील सहायक आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळीवंत यांना फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संबंधित संस्थांच्या लेटर हेडवर आम्ही त्यांच्या लोकांची नावे घेतली असून ज्यांचे नावे लेटरहेडवर आहे त्यांनाच आम्ही आमच्या आरोग्य विभागाकडून आयकार्ड दिले आहे.

 त्याचे कारण असे की त्यांना पोलीसांनी संचारबंदीच्या वेळी पकडू नये.

Advertisement

परंतु आम्ही ज्या संस्थाना व त्यांच्या लोकांना आयकार्ड दिले आहे त्या व्यतिरिक्त ते बाहेरुन कलर झेरॉक्स काढून त्याचा वापर करत असतील तर ते खरंच चुकीचे असून पुणे महानगर पालिकेची फसवणूक करत आहेत.

असा प्रकार आमच्या निर्दशनास आणुन दिल्यास त्या संदर्भात पुणे महानगर पालिका आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल असे डॉ कल्पना बळीवंत यांनी सांगितले.

कोंढव्यातील एका नगरसेवकाची ही संस्था असून त्या संस्थेला अंत्यविधीसाठी आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे.

 व त्या संस्थेच्या ३१ जणांची नावांची नोंदणी करुन त्यांना आयकार्ड दिले आहे.

 परंतु काही कार्यकर्त्यांकडून चुकिचा वापर करून पुणे महानगर पालिकेची फसवणूक केली जात आहे.

 अश्या या फसवणूकीमुळे अंत्यविधीचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्यांकडेपण संशयाने पाहिले जाईल.

ज्या संस्थाने प्रामाणिकपणे काम केले आहे त्यांचे जेवढे कौतुक करता येईल तेवढे कमीच आहे.

 परंतु जे चुकिचे काम करत असतील तर अशांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी पुणेकरांकडून होत आहे.

 मनपाचा लोगो व आरोग्य अधिकाऱ्याच्या सहीचा गैरवापर केल्याप्रकरणी पुणे महानगर पालिका आयुक्त कारवाई करणार का ?

की राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करण्याचे टाळणार ?

 जवळच्या कार्यकर्त्याकडून असे प्रकार घडत असून सदरील प्रकार नगरसेवकाला माहित नसेल का ?

जर माहित असेल तर अश्या प्रकाराला पाठिंबा देणे कितपत योग्य आहे ?  

शेकडो कलर झेरॉक्स बनवून कोणा कोणाला ते वाटप करण्यात आलेत ?

आयकार्ड देताना त्यांच्याकडून कोणी रक्कम घेतली आहे का ? घेतली असेल तर किती व का ?

जर कोणी नगरसेवकाच्या संस्थेच्या नावाचा व त्यांच्या सहीचा चुकीचा वापर करत असेल तर अश्यांवर नगरसेवक कारवाई करणार का ?

असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे .

यासंदर्भात नगरसेवक गफूर पठाण यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

                                       "पोलीसांनी आयकार्ड तपासण्याचे आहवान"
पुणे महानगर पालिकेने दिलेल्या आयकार्डचा चुकिचा वापर होताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.आता पुणे पोलिसांनी सदरील आयकार्ड पाहणी करावी व त्यात आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवागीची प्रत, त्याचे सिरीयल नंबर व इतर बाबी पडताळून पाहिले पाहिजे जेणेकरून बोगस आयकार्डचा पर्दाफाश होईल.

वाचा : मिशन अहले बैत Ajmer Sharif तर्फे Free Oxygen can च्या वाटपाचे आयोजन.

Share Now

One thought on “लॉकडाऊनच्या काळात पोलीसांनी धरू नये म्हणून बोगस आयकार्ड बनविण्याचा प्रकार.!

Comments are closed.