Former mayor : माजी महापौर आर एस कुमार यांच्या सहित ३५ जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल
Former mayor : सजग नागरिक टाइम्स : सध्या देशभरात कोरोना मुळे संचारबंदी लॉकडाऊन लागू असूनही अनेक लोक त्यास मानण्यास तयारच नाही ,
लॉकडाऊन च्या काळात नागरिकांनी घरीच बसून रहावे व सोशलडीस्टन्स ठेवावे हे बोलून बोलून सर्वांचे घसे दुखत आहे ,
पण काही नागरिकांकडून त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे.
अशिक्षितांचे सोडा अनेक सुशिक्षित लोक स्वताला उच्चभ्रू समजणारे हि अशिक्षितांप्रमाणे वागत
असल्याने अश्या सुशिक्षितांनी मॉर्निगवॉक च्या नावाखाली कायदे तोडण्यास सुरुवात केली आहे ,
अता अश्या मॉर्निगवॉक ला जाणाऱ्यावर कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून सुरु झाले असून ,
पुण्यासाहित पिंपरी चिंचवड मध्ये हि कारवाई करण्यात येत आहे .निगडी पोलिसांकडून कालपासून मॉर्निग वॉकला बाहेर पडणा-यांवर कारवाई सुरु केली आहे.
अनेक तास मृतदेह रस्त्यावर पडून ,कोरोनाच्या भीतीनं कोणी हातही लावेणा..
माजी महापौर आर एस कुमार यांच्या सहित ३५ जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे .
सध्या माजी महापौर आर एस कुमार हे भाजपात आहेत.
आकुर्डीत मॉर्निग वॉकला बाहेर आलेल्या नागरिकांना पोलिसांनी सूर्यनमस्कार करण्यास लावले. त्यासबरोबर मी स्वार्थी आहे,
मी आदेश पाळत नाही , कारण मी उच्चशिक्षित दीडशहाणा आहे ,मी कोरोना फैलावण्यात मदत करत आहे ,
गो कोरोना , मी अतिशहाणा आहे , मी मॉर्निंग वॉकर आहे , मी मॉर्निंग वॉकला चाललो आहे गो करोना,
मला सांगितलेले कळत नाही , मी गाढव आहे असा मजकूर असलेले फलक देऊन मी नियम मोडणार नाही अशी शपथ सर्वांना देण्यात आली ,
त्यानंतर त्या सर्वांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला .
VIDEO :फायनान्स कंपण्यांकडुन RBI चे आदेश धाब्यावर ? | Lockdown मध्येही बजाज Financeकडून सक्तिने वसुली सुरू