दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी राज ठाकरेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

मुस्लिम बांधवांच्या रमजान सारख्या पवित्र महिना सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानामध्ये अजान व भोंगे संदर्भात बेताल वकतव्य केले होते. या भाषणानंतर मुस्लिम समाजाचे मन दुखावले आहे.

दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर एका विशिष्ठ धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवून शांतता भंग केल्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

राज ठाकरे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३, १५३ अ , १५३ ब ,२९५ अ ,२९८ ,५००, ५०१ ,५०२ ,५०४ ,१२० ब ,३४ प्रमाणे गुन्हा तात्काळ दाखल करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

पिंपरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ यांना निवेदन देण्यात ‌आले, या प्रसंगी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शाहाबुद्दीन एम शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष ‌फय्याज शेख,

Advertisement
Advertisement

पिंपरी चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष वसीम शेख, हिंदल-वली सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मद्दसीर मुजावर उपस्थित होते. सदर निवेदन ई-मेल द्वारे महा. राज्या चे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना सुध्दा पाठवण्यात आले असल्याचे शाहाबुद्दीन शेख यांनी सांगितले.

Spread the love