Mohammadia Masjid : शासनाने मंजुर केलेले रेशन नागरिकांना व्यवस्थित मिळावे म्हणुन मोहम्मदीया मस्जिद ट्रस्ट चा पुढाकार
Mohammadia Masjid : सजग नागरिक टाइम्स : मोहम्मदीया मस्जिद ट्रस्ट लोहीयानगर पुणेच्या वतीने रेशनिंग ग्राहकांना
रेशन दुकानाजवळ सोशल डिस्टेंस ठेऊन नाष्टा, चहा पाणीचे आयोजन करण्यात आले.
करोना व लॉकडाउन मुळे नागरिकांनचे जगने कठिण झाले आहे.नागरिकांना जगण्यासाठी आधार म्हणून शासणाकडून अन्न धान्य देण्यात येत आहे .
रेशन दुकानात रेशन तर वितरीत होत आहे परंतु नागरिकांना अनेक समस्या ंना तोंड द्यावे लागत आहे.
सरकार मान्य दुकानातुन रेशन घेण्यासाठी नागरिकांना पहाटे सहा वाजल्यापासून दुपारपर्यंत
भल्यामोठ्या रांगेत उभे रहावे लागत आहेत. व वेळेवर रेशन भेटेल याची खात्रीही नाही .
नागरिकांनचे होणारे हाल अपेष्टा पाहुण लोहियानगर परिसरातील मोहम्मदीया मस्जिद ट्रस्ट व स्थानिक मुस्लिम नागरिकांनी नागरीकांना मदत करण्याचे ठरविले
व लॉकडाउन घोषित झाल्यापासून अता पर्यंत शेकडो लोकांना दररोज चहा, नाश्ता पाणी व बसण्यासाठी खुर्ची ची सोय केली.
तसेच नागरिकांना पुर्ण राशन भेटतय की नाही यावरही बारिक लक्ष ठेउन आहे.व करोना संक्रमण विषयक जनजागृती करत आहे.
यावेळी मोहम्मदीया मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल्ला शेख ,हाफिज सलाउद्दीन ,असलम पठाण ,बशीर सय्यद,
रफिक शेख ,साजिद भाई , हाजी असीफ भाई, इम्तियाज शेख,शाहरुख भाई, युनुस चिचा व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
माजी स्वीकृत सदस्य युसुफ अन्वर शेख व इतर नागरिकांनी ही सहभाग नोंदवला.
तसेच अवामी महाज पुणे व लोहियानगर पोलीस चौकी यांच्या संयुक्त विद्यमाने लोहियानगर भागातील नागरिकांना रेशन वाटप करण्यात आले.
गोल्डन जुबली ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद इनामदार, अवामी महाज ट्रस्ट चे सदस्य जुबेर दिल्लीवाले.
लोहीयानगर पोलीस चौकीचे निरीक्षक गणेश माने, पोलीस शिपाई तेजस पांडे सहित अनेक नागरिक उपस्थित होते.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाचा पुढाकार