Homeताज्या घडामोडीपुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला केडगाव येथील रुग्णाचा अंत्यविधी

पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला केडगाव येथील रुग्णाचा अंत्यविधी

social worker pune: मूलनिवासी मंच च्या कार्यकर्त्यांनी ससून येथून मृतदेह ताब्यात घेऊन बागेरहमत कब्रस्थान मध्ये दफनविधी केला

social-worker-pune-performed-the-funeral-of-a-patient-at-kedgaon

social worker pune : सजग नागरिक टाइम्स : पुणे – केडगाव येथील रहीम अब्दुल शेख वय – ५५

यांची प्रकृती बिघडल्याने दोन अल्पवयीन मुलींनी वडिलांना पुण्यात आणले.एकीचे वय १३ तर दुसरीचे १७ असे वय आहे.

कोरोना संकटात कुठलीही मदत मिळत नसल्याने हतबल झालेल्या मुली घाबरल्या होत्या.

त्यातच उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाल्याने दोघी मुली अतिशय भेदरल्या होत्या .

अशातच दवाखान्यातील काही नागरिकांनी सदर घटना मूलनिवासी मुस्लिम मंच ला कळविली.

आझम कॅम्पस मस्जीदचे ६० बेडच्या क्वारंटाइन कक्षात रुपांतर

मंच चे अंजुम इनामदार , साबीर सय्यद आणि जमीर मोमीन यांनी तात्काळ दोघी मुलींना संपर्क करून धीर दिला.

मंच चे अन्य कार्यकर्ते अमजद शेख इब्राहिम तोफखाना यांनी केडगाव येथे संपर्क साधला परंतु गावकऱ्यांनी मृतदेह गावात आणू नये असे सांगितले.

केडगाव चे तलाठी व सामाजिक कार्यकर्ते पवार यांनी ससून येथे भेट देऊन मूलनिवासी मुस्लिम मंच च्या कार्यकर्त्यांना मृतदेह पुण्यातच दफन करावा अशी विनंती केली.

VIDEO : Lockdown मध्ये अडकलेल्या मजुरांना गावी जाण्याची मुभा की शिक्षा

दरम्यान मयताचा पोस्टमार्टम रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आल्याने तलाठी सचिन काळे यांनी मुलींना स्वतः घरी एक आश्रय देऊन माणुसकीचे दर्शन घडविले,

दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलीच्या उपस्थित मूलनिवासी मंच च्या कार्यकर्त्यांनी ससून येथून मृतदेह ताब्यात घेत बागेरहमत कब्रस्थान मध्ये दफनविधी केला.

मूलनिवासी मूस्लिम मंच चे अंजूम ईनामदार, न्यु तिरंगा फौडेशन चे जमिर मोमिन.अमजद शेख.शाबीर तोफखाना ,शेख ईब्राहीम.

भारतीय एकता महामोर्चा चे शाबीर सैयद हे सध्या कोरोना संकटात नागरिकांवर दुःखाचे ढग अधिक गडद होत असताना माणुसकीचे दर्शन घडवत आहे.

शासनाने मंजुर केलेले रेशन नागरिकांना व्यवस्थित मिळावे म्हणुन मोहम्मदीया मस्जिद ट्रस्ट चा पुढाकार

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular