Azam Campus Mosque : पुणे येथील आझम कॅम्पस येथील मस्जीदचे रविवारी ६० बेडच्या क्वारंटाइन कक्षात केले रुपांतर
Azam Campus Mosque : सजग नागरिक टाइम्स : पुणे : सरकारला सहकार्य करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.
या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटीन अॅण्ड एज्युकेशन सोसायटीकडून जेवण आणि इतर अत्यावश्यक सेवांचा पुरवठाही करण्यात येणार आहे.
तसेच म्हाराष्ट्रातील अनेक मस्जीदिला सलग्न असलेल्या सभागृहाला यासाठी देण्याची घोषणा मुस्लिम समाजाने केली आहे.
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ति आहे ! भारताचे नागरिक म्हणून समाज आपली जबाबदारी पार पाडित आहे ट्रस्टकडून असे ही सांगण्यात आले आहे .
मागील बातमी : संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी आझम कॅम्पस मस्जीद इमारतीमधील संपूर्ण मजला उपलब्ध
April 23, 2020 : Azam Campus Masjid चा संपूर्ण मजला देण्याचा आझम व्यवस्थापनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारला
सजग नागरिक टाइम्स : पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता
भवानी पेठ ला लागून असणाऱ्या आझम कॅम्पस च्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाईन साठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली होती ,
हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारला असून तसे पत्र कॅम्पस चे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांना दिले आहे .
प्रशासनाच्या पत्रानंतर ही जागा ताब्यात देण्यासाठी स्वच्छता आणि सुविधांची तयारी बुधवारपासून सुरु झाली आहे.
आझम कॅम्पस मधील प्रार्थना स्थळाच्या पहिल्या मजल्यावरील ९ हजार चौरस फुट जागा सर्व वीज , पंखे , स्वच्छतागृह ,
पार्किंग सुविधांसह देण्याची तयारी येथील व्यवस्थापनाने दर्शवली होती. येथे आलेल्या संशयित रुग्णांची नाश्ता ,
जेवणाची व्यवस्था करण्याची , पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते .
आझम कॅम्पस मधील शैक्षणिक सुविधा पूर्ववत सुरु होईपर्यंत ही जागा शासनाला उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले होते.
त्यानुसार सर्व सुविधांसह हा मजला तयार झाला असल्याची माहिती आझम कॅम्पस चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे दिली.
आझम कॅम्पस परिसरामध्ये महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक अस्थापना असून २४ एकर मध्ये हा परिसर आहे.
त्यातील एका भागात पूर्वीपासून मशीद आहे. या मशिदीतील पहिल्या मजल्यावर ९ हजार चौरस फुटाचा सभागृहासारखा मजला आहे.
त्याचे रुपांतर क्वारांटाइन वार्ड मध्ये करता येणे शक्य आहे.येथील शैक्षणिक इमारतींमधील शाळा , महाविद्यालये सध्या बंद आहेत.
लागेल तेव्हा आणखी जागा देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनासमोर आहे ,असेही डॉ.पी ए इनामदार यांनी सांगितले.