ताज्या घडामोडीपुणे

आता पुण्यातील उर्दू शाळांना शनिवार ऐवजी शुक्रवारी असणार अर्ध्या दिवसाची सुट्टी

Advertisement

मा.नगरसेविका फरजाना अय्युब शेख, सामाजिक कार्यकर्ते एजाज खान व येरवडा हल्का कोर कमीटीच्या पाठपुराव्याला यश.

सजग नागरिक टाइम्स प्रतिनिधी पुणे : उर्दू शाळेला शनिवार ऐवजी शुक्रवारी अर्धा दिवसाची सुट्टी देण्याचा 2017 चा जी आर असुन ही पुणे मनपा याला लागु करत नव्हते हे कायदेशिरपणे लागू व्हावे म्हणून गेल्या 5 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते एजाज खान व येरवडा हल्का कोर कमीटी सतत पाठपुरावा करत होती.

पुणे महानगर पालिका शिक्षण विभागा तर्फे उर्दू माध्यमाच्या
प्रायमरी स्कूल, हायस्कूल स्कूलला 7 जुन पासून शनिवार ऐवजी शुक्रवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी असणार आहे.

या कामासाठी त्यांना स्थानिक नगरसेवक, पत्रकार ,वकील, स्थानिक नागरिक यांनी मदत केली.

पण सुरुवात व शेवटपर्यंत लढले ते एजाज खान .या कामासाठी मुस्लिम समाजाने एजाज खान चे आभार मानले , एजाज भाई आपको जित की बहोत बहोत मुबारक बाद.

सदरिल सत्काराचा कार्यक्रम सोमवारी 13 जून रोजी सायंकाळी ६ वाजता साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.

Advertisement
सत्कार स्विकारताना पत्रकार मजहर खान.

सदरिल कार्यक्रमाचे निमंत्रक: मा.नगरसेविका सौ.फरजाना अय्युब शेख/मा.नगरसेवक अय्युब इ.शेख होते.

मुस्लिम बँक डायरेक्टर समीर शेख,पत्रकार मजहर खान, सामाजिक कार्यकर्ते एजाज खान, मा.नगरसेवक व मुस्लिम बँक डायरेक्टर अय्युब शेख,ओबीसी चे इकबाल अन्सारी,

मा.नगरसेवक अविनाश साळवे, मा.नगरसेवक संजय भोसले, पत्रकार मजहर खान, सामाजिक कार्यकर्ते एजाज खान,मा.नगरसेविका फरजाना अय्युब शेख, ,एड वाजेद खान, मा.नगरसेवक हनिफ शेख,आर पी आय चे शैलेश चव्हाण
व इतर मान्यवर उपस्थित होते.

ज्यांनी ज्यांनी या कामासाठी योगदान दिले त्या सर्वाचे सत्कार करून त्यांचे आभार मानन्यात आले. त्यात मा.नगरसेवक अविनाश साळवे, मा.नगरसेवक संजय भोसले, पत्रकार मजहर खान, पत्रकार संजय सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते एजाज खान,मा.नगरसेविका फरजाना अय्युब शेख, ,एड वाजेद खान, मा.नगरसेवक हनिफ शेख,आर पी आय चे शैलेश चव्हाण व इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजक: येरवडा हल्का कोर कमीटी.व
निमंत्रक: मा.नगरसेविका फरज़ाना‌ अय्युब शेख होते.

सर्वांचे आभार मा.नगरसेविका फरजाना अय्युब शेख यानी मानले.

Share Now