Ajay Devgan:अजय देवगन विरोधात अजहर खान यांनी केली याचीका दाखल
सनाटा प्रतिनिधी ;Ajay Devgan News: राज्य सरकारने सन 20 जुलै 2012 रोजी पासुन
राज्यात गुटखा बंदी केलेली असताना हि उत्पादकांनी नविन शक्कल लढवून पळवाट काडून दोन पुडयांचे मिश्रण बाजारात आणले .
पान मसाल्यावर आज रोजी बंदी असली तरी छोट्या मोठ्या पान टपरीत व किराणा मालाच्या दुकानात
राजरोस पणे गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळते.
गुटखा बंदी होऊन पुर्ण पाच वर्षे झाली तरी अन्न व औषध प्रशासन विभागाला सपशेल अपयश आले आहे .
या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता
तसेस टिवीवर विमल गुटख्याची जाहिरात दाखवली असताना हि अन्न व औषध प्रशासन विभाग डोळे झाक करत आहे,
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर अहमद खान यांनी लहान मुलांवर होणारे दुष परिमाण लक्षात घेऊन
टिवीवर विमल गुटख्याची जाहिरात करणारा सिने अभिनेता अजय देवगण व विमल गुटख्याचे मालक यांच्या विरोधात
शिवाजीनगर येथील प्रथम न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग 1 श्रीमती ए.एस. मुजुमदार यांच्या कडे जनहित याचिका आज दि 17 ऑगस्ट 2017 रोजी दाखल केली आहे.
ब्याटरिवर चालणाऱ्या रिक्षा व टेम्पोची अधिक माहिती साठी या लिंकवर क्लिक करा
सदरील याचिका अॅड वाजेद खान बिडकर यांच्या मार्फत अजहर खान यांनी दाखल केली आहे.
सदरील याचिकाची पुढील सुनावणी 17 सप्टेंबर2017 रोजी पुण्यात शिवाजीनगर कोर्टात होणार आहे.
सदरील प्रकरणात अॅड गणेश म्हस्के, अॅड मिंलीद खोले, अॅड आदित्य थोरात यांनी काम पाहिले.