सजग नागरिक टाइम्स: पुणे महापालिकेतर्फे मिळकतकरात दिली जाणारी ४० टक्के सवलत काढून घेण्यात आलेली होती.
ती सवलत नागरिकांना पुन्हा मिळावी म्हणून पुणे महापालिके तर्फे पीटी ३ हा अर्ज ऑनलाईन उलब्ध करून दिला आहे. अर्ज भरून महापालिकेकडे जमा करावा लागणार असल्याने तो अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हा अर्ज भरून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यांलयांसह नागरी सुविधा केंद्र येथे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पुणे महापालिकेतर्फे मिळकतकरात दिली जाणारी ४० टक्के सवलत काढून घेण्यात आलेली होती. २०१९ पासून त्याची वसुली केली जात होती. या विरोधात पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर ही सवलत पुन्हा एकदा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्याची अंमलबजावणी यंदाच्या आर्थिक वर्षापासून केली जात आहे.पुणे महापालिकेच्या मिळकत विभागाने त्यानुसार बिले तयार करणे व ज्या नागरिकांनी ४० टक्के सवलतीची रक्कम भरलेली आहे त्यांना ती परत करणे व ती पुन्हा लागू करणे यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. सुमारे पावणेतीन लाख नागरिकांना ही सवलत पुन्हा मिळविण्यासाठी महापालिकेकडे पीटी ३ हा अर्ज सादर करावयाचा आहे.
पण हा अर्ज कुठे मिळतो, पुरावे काय जोडावे लागतात आणि अर्ज भरल्यानंतर तो कोठे सादर करावा याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता यासंदर्भात महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेले आहे.मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख म्हणाले, “पीटी ३’ हा अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरावा, हा अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मिळकत निरीक्षकाकडे जमा करावा किंवा नागरी सुविधा केंद्रांमध्ये देखील जमा करता येईल. स्थायी समितीच्या पूर्वीच्या निर्णयानुसार हा अर्ज सादर करताना यासाठी २५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष जाऊनच हे अर्ज सादर करावे लागणार आहेत अधिक महिती साठी लिंकवर क्लीक करा propertytax.punecorporation.org