Homeताज्या घडामोडीचार वर्षात एकही  वॉर्ड सभा न घेणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी 

चार वर्षात एकही  वॉर्ड सभा न घेणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी 

(Take action against corporators) वॉर्ड सभेच्या पाठपुराव्यासाठी पालिकेत ‘स्मरण आंदोलन’ !

(Take action against corporators) पुणे : चार वर्षात एकही वॉर्ड सभा न घेणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईसाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप,

एरीया सभा समर्थन मंच, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय ( एन ए पी एम), स्वराज अभियान,

स्वराज इंडिया आणि इतर सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून शुक्रवारी दुपारी पालिकेत ‘स्मरण आंदोलन’ करण्यात आले.

आयुक्त विक्रमकुमार आणि निवडणूक अधिकारी अजित देशमुख यांच्याशी चर्चा झाली या चर्चेदरम्यान निवडणूक अधिकारी  देशमुख  यांनी मागणीचे मुद्दे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत,

सभागृहात ठराव मंजुरीसाठी मांडण्याचे आश्वासन दिले तसेच आयुक्तांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 

१५  ऑगस्टपर्यंत जर पुणे मनपा आयुक्त यांनी निर्णय घेतला नाही,

तर तीव्र मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ‘ इनक्रेडिबल समाजसेवक  ग्रुप ‘ चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी दिला . 

या आंदोलनात  जेष्ठ समाजसेवक मानव कांबळे, इब्राहिम खान, राज फैय्याज ,रहिसा शेख, वीणा  कदम,

शाहिन सिंदगी, राजू सय्यद,  आयशा फारस, कबिर शेख, सचिन आल्हाट , इम्रान घोडके,

तेजस आडागळे ,इरफान बारगिर उपस्थित होते.

वाचा : फुकट बिर्याणीचा प्रकार समोर येताच पोलिसांची सावधगिरी! सावधगिरी का मुस्कटदाबी,

कलम 29/क/2/1 नुसार चार वर्षांत एकहि क्षेत्रसभा न घेतल्याने मनपा आयुक्त यांना त्या नगरसेवकांना अनर्ह ठरविता येते .

जर आयुक्तांनी आपल्या कर्तव्य पालनात हयगय केली या कृत्याबाबत महाराष्ट्र मुन्सीपल अधिनियम 1949 च्या कलम 36/3 नुसार आयुक्त या पदास अपात्र ठरतो.

यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी आयुक्तांना ‘राजीनामा घ्या, अथवा राजिनामा द्या ‘ अशी मागणी केली.

दिनांक 10 ऑगस्ट  पासून समिती नेमण्यात येवून यात मार्ग काढण्यात येणार आहे ,असे आश्वासन पुणे मनपा तर्फे देण्यात आले. 

आंदोलनाच्या इतर मागण्यामध्ये प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक गफूर पठाण यांनी पुणे मनपाची विज चोरी करून तसेच विज,

आकाशचिन्ह, उद्यान, पथ या विभागाचे लाखों रूपयांचे महसूल बुडविले

तसेच पुण्यातील शहर विद्रुपीकरण आणि संकल्पना फलके लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी तसेच निधीचा वापराची  चौकशी करावी यांचा समावेश होता .

मनपा आणि निविदेच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी समिती नेमण्यात यावी या मागणीसाठी

इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान हे गेले वर्षभर माहिती अधिकार आणि स्वसंपर्कातून विविध आधिकारी आयुकत उप आयुक्त,

झोन उप आयुक्त, वार्ड उप आयुक्त यांचा पाठपुरावा करीत आहेत .

नागरीकांचा प्रशासकिय कामात सहभाग व मनपा कारभारात पारदर्शकता यावी हा उद्देश असल्याचे बागवान यांनी सांगितले.

video पहा : क्षेत्र सभा न घेणाऱ्या नगरसेवकांचे आयुक्तांनी राजीनामे घ्यावे : असलम इसाक बागवान

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular