हडपसरमध्ये एका महिलेचा खून(womans murder in Hadapsar)
womans murder in Hadapsar;हडपसरमधील गांधीन खिळा सदाशिवनगर फुरसुंगी ता.हवेली.
पुणे येथील क्यानलमध्ये एका महिलेला मारून फेकलेअसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने.
हडपसर पोलिसांनी तत्परतेने जावून तेथे पाहणी केली असता त्यांनी महिला नामे माधुरी पवार उर्फ शेख,वय २८ रा,भोसले व्हिलेज सर्व्हे नंबर १७८ पर्वत सबूर कालखर.
या महिलेची बॉडी क्यानोल मधून काढली,सदरील प्रकरणाचा अधिक तपास केला असता हि महिला गांधीन खिळा सदाशिवनगर फुरसुंगीतील एका बांधकाम साइटवर कामास होती
या महिलेला साइटवरून जबरदस्तीने रिक्षात बसवून नेण्यात आले होते.
अज्ञात कारणावरून या महिलेला मारहाण करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने याला क्यानलमध्ये फेकून दिले होते.
एक महिला व दोन पुरुषांनी नेले असल्याची माहिती मिळाली असून सर्व आरोपी फरार आहे.
या प्रकरणी कल्याणी शिंदे पोलीस उपनिरीक्षक हडपसर यांनी फियाद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे)अंजुम बागवान करत असल्याची माहिती मिळाली आहे.