कामावरून कमी केल्याचा लढा कामगारांनी १६ वर्षांनी जिंकला (lumax auto technologies ltd pune)
लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीस मधील २१ कामगारांना कामावर घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश
lumax auto technologies ltd, pune: (पूर्वीची धनेश ऑटो इलेक्ट्रिकल लिमिटेड ) कंपनीतून बेकायदेशीरपणे
नोकरीवरुन काढलेल्या २१ कामगारांना कामगार न्यायालयातील लढयात १६ वर्षांनी यश मिळाले आहे !
या कामगारांना कामावर घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश दिले आहेत . कामगारांच्या बाजूने लढा देणारे वकील अॅड. संतोष म्हस्के यांनी ही माहिती दिली.
(lumax auto technologies ltd, pune) लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीस (पूर्वीची धनेश ऑटो इलेक्ट्रिकल लिमिटेड )
या कंपनीतील २१ कामगारांना कोणतेही कारण न देता नियमबाह्य रित्या कमी करण्यात आले होते.
त्यांनी म्हस्के यांच्या मार्फत कामगार न्यायालयात धाव घेतली.
१६ वर्ष चिवटपणे खटला लढल्यावर २६ जून रोजी निकाल कामगारांच्या बाजूने लागला.या निकालाची प्रत आज ९ जुलै रोजी प्राप्त झाली.
याबाबत अधिक माहिती अशी :या कंपनी व्यवस्थापनाने महाराष्ट्र लेबर युनियन शी संगनमत करून २१ कामगारांना १५ सप्टेंबर २००३ पासून नोकरीवरून कमी केले होते .
या कामगारांना उपासमारीचे जीवन जगावे लागत होते . न्यायालयीन लढ्यासाठी खर्च करण्याची ताकदही त्यांच्यात उरली नव्हती .
सामाजिक कार्यकर्ते एड . संतोष म्हस्के यांनी विना मानधन या कामगारांचा न्यायालयीन लढा सलग १६ वर्षे लढला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्या . मधुरा मुळीक यांनी कंपनीचा कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय बेकायदेशीर आणि अनुचित कामगार प्रथांचा ठरविला .
सर्व २१ कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले . या २१ कामगारांना कमी केल्याच्या दिवसापासून आजपर्यंतचे निम्मे वेतन ,
अनुषंगिक आर्थिक फायदे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत .कंपनी व्यवस्थापनास ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे .
या दंडाची ५ हजार रुपये रक्कम कमी केलेल्या प्रत्येक कामगारास देण्याचा आदेशही दिला आहे .
या निर्णयामुळे २१ कामगारांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे .
कामगारांतर्फे एड . संतोष म्हस्के यांनी तर कंपनीतर्फे एड . मनीषा मोरे यांनी काम पाहिले अशी माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली .