ताज्या घडामोडीपुणे

फ्लॅट मधील वीजप्रवाह बंद करून ९८,५००रूपयाची कॉपर वायर चोरी

Advertisement

copper wire theft : मुद्रा सोसायटी मध्ये ९८,५००रूपयाची कॉपर वायर चोरी

Copper wire theft in the mudra Society

सजग नागरिक टाइम्स (copper wire theft): बिबवेवाडी पोलिस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या मुद्रा सोसायटीत

एका अट्टल चोरा कडून ९८,५०० रूपयाची कॉपर वायर चोरी करून तेथून पळ काढण्यात आला.

(Mudra)मुद्रा सोसायटी मधील दरवाजा नसलेल्या एका उघडया फ्लॅट चे इलेक्ट्रीकचे काम करण्यासाठी तांब्याची कॉपर वायर ठेवली असताना,

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दि.१९/१०/२०१९ रोजी रात्री आठ ते दि.२०/१०/२०१९ रोजी सकाळी साडे दहा दरम्यान मुद्रा सोसायटी,सी बिल्डींग,

स.नं.६८५/१,सातारा रोड,बिबवेवाडी,पुणे मधील वीजप्रवाह बंद करून,वायर कट करून,मेन वायर ही पार्कीगचे डक मधुन ओढुन काढुन

एकुण ९८,५०० रू किमतीची २,१०७ मीटर लांब तांब्याची कॉपर वायर चोरी करून नेली आहे. या प्रकरणी जयतीर्थ कुलकर्णी,वय-४२,रा.आंबेगावं-बुद्रुक,पुणे

यांनी बिबवेवाडी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे, पुढील तपास चालू असल्याचे पोलिस हवालदार . व्हि.एन.शिंदे म्हणाले.

इतर बातमी : हडपसर येथे अॅक्टीव्हाच्या डिक्कीतून ४,५०,००० रुपये लंपास

सजग नागरिक टाइम्स :हडपसर पोलिस स्टेशन च्या हद्दीतील रविदर्शन येथील सारस्वत बँके समोर दिनांक २२ /१०/ २०१९ रोजी दुपारी .१२/४५ वाजता अॅक्टीव्हा दुचाकी ही पार्क केली होती

Advertisement

दुचाकीतील डिक्की मध्ये फिर्यादी महिला हया ते काम करीत असलेल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीची रोख रक्कम ४,५०,००० रुपये व बँकेचे दोन पासबुक डीकीला लॉक करुन ठेवले होते ,कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदरचा ऐवज चोरी करून नेला असल्याची तक्रार

फिर्यादी महिलेने हडपसर पोलिस स्टेशन येथे केली असून पोलिस उपनिरीक्षक जाधव हे पुढील तपास करत आहे.

इतर बातमी : एस.टी मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे नेकलेस चोरी

सजग नागरिक टाइम्स : कृष्णा डांगरे,वय-२३ वर्षे,रा.नवी पेठ,सोलापुर हे पुणे ते सोलापुर एस.टी.ने प्रवास करीत असताना,

यांच्याआई जवळ ठेवण्यात आलेल्या पर्स मधून ३०,०००/-रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस चोरी करण्यात आला.

सदरील प्रकार हा दि.२२/१०/२०१९ रोजी दुपारी दीड ते दोन च्या दरम्यान शेवाळवाडी बाजार समिती समोर एस.टी.आली असताना झाला असल्याचे फिर्यादी महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे.

या बद्दल हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोणाला हि अटक करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

हेपण वाचा : वानवडी पोलिसांनी केले दागिने चोरांना अटक
पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला मार्केटयार्ड पोलिसांनी केली अटक
Share Now

2 thoughts on “फ्लॅट मधील वीजप्रवाह बंद करून ९८,५००रूपयाची कॉपर वायर चोरी

Comments are closed.