Demand for action : मुस्लिम महिलेचे अंतिम संस्कार हिंदू पद्धतीने करणा-यावर कडक कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Demand for action : सजग नागरिक टाइम्स :
पुणे : ताडीवाला रोड परिसरातील मुस्लिम समाजातील रहिवासी महिला हिचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला.
सदर महिला मुस्लिम असतानाही तिचा अंत्यविधी पोलिसांनी हिंदू धर्म रीतिरिवाजा प्रमाणे केला असल्याची लेखी तक्रार मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
रशिदा इस्माईल शेख ( वय 70 राहणार ताडीवाला रोड ) यांचा दिनांक 22 सप्टें 2020 रोजी ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.
सदर महिलेला जवळचे कोणीही नातेवाईक नसल्याने स्थानिक मुस्लिम समाजाच्या लोकांनी सदर मयत ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्याबाबतची विनंती बंडगार्डन पोलीस ठाणे यांच्याकडे केली होती.
परंतु सदर विनंती नाकारत पोलिसांनी सदर मुस्लिम महिलेचा अंत्यविधी हिंदूधर्म रीतीरिवाजाप्रमाणे स्मशानभूमी येथे केला असल्याचे इनामदार यांनी सांगितले .
ही बाब अत्यंत धक्कादायक भावना दुखावणारी आहे.
वाचा : नगरसेवक गफुर पठाण यांच्या स्वनिधीतून 2 व्हेंटिलेटर चे वाटप.
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने नुकतेच अंत्यविधी करताना सन्मानपूर्वक व त्या व्यक्तीच्या धर्मानुसार करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
रशीदा इस्माईल शेख या इस्लाम धर्माला मानणाऱ्या होत्या,
मृत्यूनंतर संपुर्ण अंत्यविधी हा इस्लामिक रीतिरिवाजाप्रमाणे व्हावा यासाठी अन्य कोणीही खर्च करू नये म्हणून त्यांनी स्वतः सुमारे पाच हजार रुपये स्थानिक मुस्लीम मंडळाकडे जमा केली होती.
तसेच त्यांचे राहते घर हे देखील मृत्यूनंतर मस्जीदसाठी दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
त्यानुसार स्थानिक मुस्लीम कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रशीदा शेख यांचा अंत्यविधी मुस्लिम धर्म रीतिरिवाजाप्रमाणे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
परंतु बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कोणालाही न जुमानता रशिदा शेख यांची अंतिम इच्छा ची परवा केली नाही ,
अंतिम इच्छा नाकारत त्यांचा अंत्यविधी हा गैरमुस्लिम पद्धतीने किंबहुना हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे अग्नीदहा करून केला.
सदर बाब मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावणारे असल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी सदर निवेदनात अंजुम इनामदार यांनी केली आहे.
दरम्यान सदर प्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील पोलीस आयुक्त यांना सादर केलेल्या निवेदनात इनामदार यांनी केलेली आहे.
याबद्दल अधिकार्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
सदर प्रकरणी कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील दोन दिवसात आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
हडपसर मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकरांसहित ४१ जणांवर गुन्हे दाखल