ताज्या घडामोडीलेख

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे नव्या पोलीस आयुक्तांसमोर आव्हान

Advertisement

Crime in pune: सजग नागरिक टाईम्स विषेश : अजहर खान

Crime in pune : पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात असले तरी आज पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पुणेकर त्रस्त झाले आहे.

खून, खूनाचा प्रयत्न, चोरी, सायबर क्राईम व इतर गुन्ह्यां मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाढवळ्या खून होत असल्याने पोलीसांसमोर अनेक चैंलेज निर्माण झाले आहे.

त्यात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने पुण्यातील भाईगिरीला उत आले आहे. चार पोरं जमली की आपन भाई झालो.

ज्या पोरांना मिश्याही फूटलेल्या नाही ते आज भाईगिरीचे स्वप्न पाहून स्वताचे आयुष्य बरबाद करत आहे.

Rising crime in Pune poses a challenge to the new Commissioner of Police Amitabh Gupta

वाचा > वाईन शॉपच्या बाहेर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

आताच्या पिढीला दुचाकी,कार, ब्रांडेड कपडे, गळ्यात सोन्याची चैन,रोलेकस घडी, दारुचे व्यसन, रात्री पब,

हुक्काचे व्यसन जडल्याने ते पुर्ण करण्यासाठी कोणत्याही परिणामाला सामोरे जाण्यास तयार झाले आहे.

त्यात आई-वडीलांच्या लाडामुळे आजची तरुणाई गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली आहे.

आज १७-१८ वयाच्या आतील मुले खून करायला घाबरत नसल्याने चिंतेचा विषय बनलेला आहे.

जमिनीच्या व्यवहारात गुन्हेगार दाखल झाल्याने व झटपट लाखो रुपये मिळत असल्याने पुणे शहरात गुन्हेगारांमध्ये एकमेकांविरोधात वर्चस्व निर्माण करण्यासाठी जीव घेण्या पर्यंत मजल गेली आहे.

एखाद्याचे जीव स्वस्त झाले आहे का ?

आज तडीपार केले तरी काही पोलिसांना हाताशी धरून पुन्हा शहरात दाखल होत तोडफोडीचे गुन्हे ही घडले आहे व घडत ही आहे.

मग तडीपार केलेच का असा प्रश्न ही पुणेकरांसमोर उपस्थित होत आहे.

Advertisement

आज पुण्यातील अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याने त्यातून मिळणाऱ्या चिरीमिरीतून भाईगिरी करणा-यांना आर्थिक बळ मिळत आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी बराच प्रयत्न केला. त्याला यश ही आले.

परंतु कोरोना संक्रमणामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने पुणे शहरात पुन्हा खूनाचे सत्र सुरू झाले व ते आता थांबते थांबेना,

पुणे शहरातील कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात रोज खून,खूनाचे प्रयत्नाचे गुन्हे दाखल होताना दिसत आहे.

वाचा > शिवसेनेचे दीपक मारटकरचा खून करणारे जेरबंद

आज शहरात सर्वात जास्त खून, खूनाचा प्रयत्न, चोरीच्या घटना जास्त घडत असल्याने आरोपींना पकडण्यासाठी पोलीसांसमोर रोजचेच आव्हान आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी आजच पाऊल उचलणे अंत्यंत गरजेचे आहे.

नाही तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर कारवाईचा फार्स आवळण्यात काही फायदा होणार नाही.कारण गुन्हेगारीचे लोण सर्वत्र ठिकाणी पसरत चालले आहे.

आताच गुन्हेगारांचे मुसक्या आवळण्यास पोलीसांनी सुरू केले पाहिजेत.

वाचा > भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात खुन

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या समोर एका प्रकारे आव्हानच आहे.

ते आता हे आव्हान पेलतील का ? गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ते काय पाऊल उचलतील ?

पुणेकरांच्या मनावर चांगले काम करून ठसा उमटवितील का ? हे आता येणारा काळच ठरवेल.

वाचा > राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून,

Share Now

One thought on “पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे नव्या पोलीस आयुक्तांसमोर आव्हान

Comments are closed.