ताज्या घडामोडी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

Advertisement

(CBI files FIR against Anil Deshmukh) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.

त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या शंभर कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयने चौकशी केली.

शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली.

अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं छापेमारी केली आहे.

सीबीआयने मुंबईत बांद्रा, वरळी तसेच नागपूर येथील दहा ठिकाणी छापेमारी केली आहे.

सीबीआयने चौकशी केल्यानंतर दिल्लीमध्ये अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वाझे यांच्यामार्फत महिन्याला शंभर कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.

पहिल्यांदाच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून थेट गृहमंत्र्यावर वसुलीचा आरोप झाल्यामुळे सरकारला अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला.

त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं होतं. न्यायालयाने याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता.

Advertisement

त्यानुसार सीबीआयने पंधरा दिवसानंतर अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तसेच मुंबईसह राज्यातील दहा ठिकाणी घर आणि मालमत्तांवर छापेमारी केली आहे.

काय घडलं ?

25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर एका कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या.

काही दिवसांनी कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे अडकल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले.

विरोधीपक्षांनी विधानसभेत आणि बाहेरही हा मुद्दा उचलून धरत कारवाईची मागणी केली.

राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटवले.

त्यांच्या जागी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.

या कारवाईनंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावरच खंडणीचे आरोप केले.

बार मालक, हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला 100 कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिले होते,

असा आरोप परमबीर सिंग यांनी लगावला. या खंडणीच्या दबावामुळेच वाझेंनी कृत्यं केली का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला.

Share Now

One thought on “राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

Comments are closed.