Homeताज्या घडामोडीकोंढवा, विमाननगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

कोंढवा, विमाननगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

पुणे : पुणे महापालिका झोन क्र.२ मधील कोंढवा बुद्रुक स. नं. १८, २४, ५८, ५९ आणि झोन क्र. ४ मधील लोहगाव (जुनी हद्द) विमाननगर स. नं. १९९, २०९/१ येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

यात ३३ हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. कोंढवा बुद्रुक स.नं. १८ येथील विविध दुकाने आणि गाळ्यांवर कारवाई केली.

कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

त्यात ११ हजार ६६० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे पाडण्यात आली. लोहगाव (जुनी हद्द) विमाननगर स.नं. १९९,२०९/१ येथील सीसीडी चौक विमाननगर, दत्तमंदिर चौक ते देवकर चौक इत्यादी विमाननगरच्या विविध भागातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली.

त्यात २१ हजार ७३२ चौरस फूट क्षेत्र मोकळे केले. अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलिस कर्मचारी, जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर आदींच्या साहाय्याने ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

मराठी/हिंदी न्यूज चॅनेल सजग नागरिक टाइम्स शी व्हाट्सएपवर कनेक्ट व्हा आणि हेल्थ, वेल्थ, Stock market, क्राईम, राजकारण जगताशी संबंधित ठळक बातम्या ऑनलाईन ऑफर ची महिती मिळवा.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular