ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावातील मस्जिद बांधण्यासाठी किसन चव्हाणही प्रयत्नरत

Advertisement

गावातील मस्जिद बांधण्यासाठी मुस्लिम बांधवानसाहित किसन चव्हाणही प्रयत्नरत (village in India)

kisan-chavan-was-also-trying-to-build-a-mosque-in-the-village-in-india

सजग नागरिक टाइम्स : village in India :सातारा : स्वतःच्या धर्मवाढीसाठी तर सगळेच प्रयत्न करत असतात,

पण इतर धर्मियांना प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्या अडचणी बाजूला सारण्याचे काम क्वचितच लोक करत असतात,

यातील एक व्यक्ती आहे किसन शामराव चव्हाण वय 60 वर्ष चव्हाण हे रिटायर पोलीस उपनिरीक्षक आहे,

किसन चव्हाण हे पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक होते ,

किसन चव्हाण हे तालुका कोरेगाव जिल्हा सातारामधील शिरंबे या गावाचे रहिवासी आहे शिरंबे या गावात एक ऐंशी ते नव्वद वर्षे जूनी मस्जिद आहे.

video

हेपण वाचा :कीचड़ से भरे मंदिर को मुस्लिम नवजवानोने किया साफ़

तिचे नाव आलिशान मस्जिद आहे मस्जिद ही वीट मातीची असून धोकादायक झाल्याने तीचे नूतनीकरण करण्यात येत आहे,

त्या नूतनीकरणासाठी गावातील मुस्लिमांसहित इतर लोकांनीही सहकार्य केले आहे.

तसेच सदरील मस्जिद ही उत्तम बनावी म्हणुन किसन शामराव चव्हाण ही त्यांच्या ओळखी पाळखीच्या लोकांना मदत मागता आहे.

Advertisement

किसन चव्हाण यांचे वैशिष्ट्य हे आहे की हे कोणाकडूनही रोख रक्कम स्वीकारत नाही.

ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी मस्जिदच्या नावाने चेक द्यावा असे म्हणून लोकांना मदत करण्यास प्रेरित करत आहे.

सदरील गावापासून पाच ते सात किलोमीटर पर्यंत दुसरी मस्जिद नसल्याने स्थानिक मुस्लिम बांधवांना अनेक प्रकारे त्रास होत होता.

त्यामुळे स्थानिक मुस्लिम बांधवांना मदत करण्यासाठी किसन चव्हाण यांची ही धावपळ चालू आहे.

हेपण वाचा : हजरत सय्यद मोहम्मद साहब पाचपीर दर्गाहवर दीपोत्सव साजरा

रीलेटेड बातमी :(celebrated Deep utsav):October 21, 2017 सजग नागरिक टाइम्स :पुणे लष्कर भागातील सोलापूर रोडवरील बंगला नंबर एकमधील हजरत सय्यद मोहम्मद साहब पाचपीर दर्गाहवर सर्व धर्मीय बांधवानी एकत्रित येऊन पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला .

या दीपोत्सव कार्यक्रमात पुणे लष्कर भागातील हिंदू – मुस्लिम – ख्रिचन बांधवानी एकत्रित येऊन हा दीपोत्सव साजरा केला .

दर्गाहमध्ये स्वस्तिक आणि ओम आकारामध्ये पणत्या ठेवण्यात आल्या होत्या . यावेळी सर्व बांधवाना दर्गाहचे खादिम जयकुमार राघवाचारी यांच्याहस्ते मिठाईवाटप करण्यात आली .

या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये राजा बडसल , ज्योती राघवाचारी , मधू राजा बडसल , गीता राघवाचारी ,युगंधर बडसल , तन्वीर सय्यद व सुरज राघवाचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Share Now