हडपसर मध्ये एका युवकाच्या हत्येच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. गिरीधर उत्तरेश्वर गायकवाड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना काल घडली असून गिरीधर उत्तरेश्वर गायकवाडच्या हत्येप्रकरणी हडपसर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्या झालेला गिरीधर गायकवाड हा अमरावती कारागृहाचे अधीक्षक उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा आहे.
हडपसर मधिल ग्लायडिंग सेंटरवरील मैदानात ही घटना घडली.
21 वर्षीय गिरीधर गायकवाड आणि साक्षी पांचाळ हे एकाच कॉलेजमध्ये शिकतात आणि एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. साक्षी चा प्रेमविवाह झालेला असूनही ती गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरी राहत होती.
साक्षीचा नवरा काल तिला भेटायला आला असता त्याला साक्षी च्या मोबाईलमध्ये गिरीधर चे फोन रेकॉर्ड दिसले.
त्यानंतर साक्षीच्या नवऱ्याने तिला गिरीधरला फोन करुन बोलावून घ्यायला सांगितले.
साक्षीने गिरीधर गायकवाडला हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या जागेत बोलावून घेतले.
यावेळेस साक्षी पांचाळ तिचा नवरा, नवर्याचे दोन मित्र आणि साक्षीचा भाऊ असे पाच जण तिथं उपस्थित होते. त्यावेळी गिरीधरवर हल्ला करण्यात आला. ज्यात गिरीधरचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलीसांनी साक्षी पांचाळ आणि तिच्या भावाला कालच ताब्यात घेतलं आहे. तर इतर साथीदारांचा शोध सुरु होता. त्यानंतर पळालेल्या अन्य तीन आरोपींसह एकूण पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गिरीधरच्या मोबाईलवर काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीचा फोन आला होता. तिला भेटून येतो असं सांगून घरातून गेल्यावर बराच वेळ तो परतला नाही.
त्यानंतर अगदी काही मिनिटांनी त्याच्या वडिलांनी घरी फोन केला आणि ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात गिरीधर याची हत्या झाल्याचे सांगितले.
तिथे पोलीस गेल्यावर गिरीधर याचा मृतदेह असल्याची ओळख पटली.
हडपसर पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे.