ताज्या घडामोडी

जगन्नाथ शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Advertisement

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील हॉटेल वैशाली आणि रुपालीचे मूळ मालक श्रीधर बाबू शेट्टी यांच्या निधनानंतर सध्याचे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून हॉटेल वैशाली व रुपाली ची मालमत्ता गिळंकृत केल्याचा आरोप श्रीधर बाबू शेट्टी यांच्या मुलीने केला. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुरुवारी (13 एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी शशिकला श्रीराम शेट्टी (वय-63, रा.सायकल सोसायटी, क्वार्टर गेट, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. जगन्नाथ होन्नया शेट्टी (रा. मोदी बाग, शिवाजीनगर, पुणे) आणि शशेंद्र सुंदर शेट्टी (रा.बाणेर रोड, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीच्या वडिलांनी फर्ग्युसन कॉलेज रोडवर वैशाली व रुपाली ही दोन हॉटेल्स उभारली होती. गुणवत्तेमुळे ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर आरोपी जगन्नाथ शेट्टी यांनी फिर्यादी व इतर कुटुंबीयांचा विश्वास संपादन करत दोन्ही हॉटेल्सची जागा गिळंकृत केल्या. या दोन्ही हॉटेल्समधून मिळणारा नफा स्वतःच्या नावावर करून घेत कोट्यावधी रुपयांचा अपहार केला. तसेच फिर्यादींच्या आईला वडिलांनी दिलेले दागिने व इतर मालमत्ता हडप केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस निरीक्षक सुचेता खोकले अधिक तपास करीत आहेत.

Share Now

Leave a Reply