पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला लोकसेवा हक्क आयोगाचा दणका..!

Pune RTo News : वेळेवर लायसन्स न दिल्याने मागविला अहवाल..

pune-rto-hits-public-service-rights-commission

Pune RTo News : सजग नागरिक टाइम्स प्रतिनिधी. पुणे शहरातील शासकीय कामकाज म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी तारेवरची कसरत.

त्यात महिनोमहिने हेलपाटे मारून ही कामकाज वेळेवर होत नसल्याचे अनुभव पुणेकरांना पाहण्यास मिळत आहे , तरीही जाब विचारण्याची हिंमत काही होत नाही.

नाईलाजास्तव नागरिकांना एजंटांना धरावे लागते आणि आपले काम करून घ्यावे लागते ,असाच प्रकार पुणे प्रादेक्षिक परिवहन कार्यालयात ( RTo) सुरू आहे.

Advertisement

एजंटांचे काम त्वरित तर नागरिकांना थांबावे लागते रांगेत.!

नागरिकांचे कामे वेळेवर व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 साली आणला,

त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा हा उद्देश असला तरी हातावर मोजण्या इतक्याच नागरिकांना सदरील कायद्याची माहिती असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

सदरील कायद्याचा भंग झाल्यास कारवाई होते हे नक्कीच.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते वाजीद एस खान यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भोंगळ कारभार संदर्भात

आणि लायसन्स उशिरा मिळाल्याची लेखी तक्रार लोकसेवा हक्क आयोगाकडे केली होती.

त्या तक्रारीची दखल घेत आयोगाने चौकशी करून अहवाल मागविल्याने प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते,

Advertisement

यामुळे स्वतःची चूक झाल्याचे कबूल करत यापुढे दक्षता घेतली जाईल अशी विनंतीही केली गेल्याचे उघडकीस आले आहे.

हकीकत अशी की वाजिद खान यांचा भाचा तनवीर खान याने (आरटीओ) पुणे प्रादेक्षिक कार्यालयाकडे

रीतसर अर्ज करून लायसन्ससाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून 29 जुलै 2019 रोजी ट्रायल घेण्यात आले होते.

Advertisement

इतर बातमी :टिळक रोड येथील kothari wheels चा परवाना 30 दिवसासाठी निलंबित

ट्रायल झाल्यावर नियमानुसार 15दिवसात लायसन्स घरपोच मिळणे आवश्यक असताना तन्वीर याला वेळेवर लायसन्स मिळाले नसल्याने पाठपुरावा करावा लागला .

त्याचे प्रकरण ऑनलाईन मध्ये पेंडिंग असल्याचे दाखवत होते, परंतु दीड महिना झाल्यावरही लायसन्स मिळत नसल्याने

Advertisement

सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी लोकसेवा हमी कायद्याचा भंग झाल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुंबई या ठिकाणी दाद मागितली,

त्याची गंभीर दखल घेत आयोगाने तक्रारदारास विलंबाने सेवा का दिली याबाबत सदरील प्रकरणाची चौकशी करून विलंबाच्या कारणासह चौकशी अहवाल तात्काळ अवगत करण्याचे निर्देश दिले होते.

त्यावर यापुढे अशी चूक होणार नाही आणि दक्षता घेतली जाईल अशी विनंती करत आहवाल पाठवण्याचे ही सदरील पत्रात नमूद आहे.

तर पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा द्वारे यापुढे अशी चूक होणार नाही

Advertisement

व नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी अशी समज दिल्याचेही माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रात उघड झाले आहे.

आयोगाच्या दणक्याने लवकर कामे होतील अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

नागरिकांना वेळेवर परवाने लायसन्स लोकसेवा हमी कायद्यानुसार दिलेल्या मुदतीत न झाल्यास नागरिकांनी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे लेखी तक्रार करावी. वाजिद एस खान :सामाजिक कार्यकर्ते

Advertisement
VIDEO NEWS : पुण्यात अवैध Dance Pub ची चलती जोमात

2 thoughts on “पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला लोकसेवा हक्क आयोगाचा दणका..!

Comments are closed.