पुणे शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा पालिकेला पडला विसर.. वर्षभरात फक्त तीनच कारवाई.

Bogus Doctors : पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड दखल घेतील का ?

the-municipality-forgot-to-prosecute-bogus-doctors-in-pune-city-only-three-actions-a-year

Bogus Doctors News : सजग नागरिक टाइम्स : पुणे शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यात नव्याने गावे ही समाविष्ट करण्यात आली आहे.

त्याचा फायदा घेत अनेक बोगस डॉक्टरांचा वावर ही वाढलेला आहे . बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार पुणे महानगरपालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांना आहे.

( Bogus Doctors ) बोगस डॉक्टरांना शोधून आरोग्य विभागाने स्वतः कारवाई करायची असते,

Advertisement

परंतु आरोग्य अधिकाऱ्यांकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई होताना दिसत नसल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.

आज पुणे शहरात मुळव्याध , हरण्या ,गर्भधारणा , भगंदर व इतर प्रकारच्या आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी उच्छाद मांडला आहे .

राजरोसपणे थेट दुकाने थाटून व्यवसाय करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा काम या बोगस डॉक्टरांकडून सुरू आहे.

Advertisement

इतर बातमी : वीज चोरी केल्याप्रकरणी हडपसर मधील “शिक्षणसम्राटा ”वर महावितरणची कारवाई

परंतु पालिकेच्या आरोग्य विभागाला याचे गांभीर्य नसून बोगस डॉक्टरांवर एकाप्रकारे मेहरबानी केली जात असल्याचा संशय निर्माण झाले आहे ?

नागरिकांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या तक्रारी केल्या तरी महिनोंमहिने कारवाई होत नसल्याचेही अनुभव काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

या अगोदर तत्कालिन सहा आरोग्य अधिकारी वैशाली जाधव यांच्याकडे कार्यभार असताना त्यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करून तीस बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले होते .

Advertisement

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला लोकसेवा हक्क आयोगाचा दणका.

यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले होते . तर कारवाईच्या भीतीपोटी काही बोगस डॉक्टर भूमिगत झाले होते .

जाधव यांच्याकडून कार्यभार जाताच पुन्हा बोगस डॉक्टरांचे डोके वर आले आहे. या बोगस डॉक्टरांवर कारवाईचा फास आवळणे अत्यंत गरजेचे आहे .

Advertisement

नाहीतर आप्तकालीन स्थितीमध्ये पहिले हीच यंत्रणा कामाला लागते ही काय सांगायची गरज नाही,

खरं तर दक्ष अधिकारी वैशाली जाधव यांच्याकडे पुन्हा कार्यभार सोपवला गेल्यास नक्कीच कारवाई चा आकडा वाढेल यात काहीच शंकाच नाही,

यावर नव्याने कार्यभार स्वीकारलेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड बोगस डॉक्टर विरोधात काय भूमिका घेतात यावर लक्ष टिकून राहणार आहे.

Advertisement

निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय केल्याने दोनशे शिक्षकांवर गुन्हे दाखल

Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

2 thoughts on “पुणे शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा पालिकेला पडला विसर.. वर्षभरात फक्त तीनच कारवाई.

Comments are closed.