Homeताज्या घडामोडीप्रभाग क्र २६ मधील सर्व डी.पी रस्ते चालू कराअन्यथा मनसे स्टाईल ने...

प्रभाग क्र २६ मधील सर्व डी.पी रस्ते चालू कराअन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करू : सय्यद अझरुद्दीन

D P road hadapsar : प्रभाग क्र २६ मधील सर्व डी.पी रस्ते चालू कराअन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करू : सय्यद अझरुद्दीन

D P  road hadapsar news 2020

D P road hadapsar : सजग नागरिक टाइम्स : (प्रतिनिधी) पुणे हडपसर येथील प्रभाग क्र २६ मध्ये दिवसंदिवसे वाहतुकीची समस्या जटील होत चालली आहे.

त्यामध्ये या प्रभागातील विध्यार्थी , सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

या समस्यांचा समाधान म्हणून प्रभाग क्र २६ मधील सर्व डी पी रस्ते खुले करण्यात यावे अशी मागणी निवेदना द्वारे मनसे चे सय्यद अझरुद्दीन यांनी केली आहे.

पूर्ण शहराला परिचित असा सय्यदनगर येथील रेल्वे गेट क्र ७ कडे पुणे महानगरपालिका वारंवार दुर्लक्ष करत आहे.

इतर बातमी : वीज चोरी केल्याप्रकरणी हडपसर मधील “शिक्षणसम्राटा ”वर महावितरणची कारवाई..!

या गेटवर जोडणारा मोहम्मदवाडी व हांडेवाडी रोड रुंदीकरणाचा विषय हा हि जटील झाला आहे.

सर्वे नं ७४ मधील एकमेव 18 मीटर डी पी रस्ता आहे तो हि अपूर्ण आहे ,

हा डी.पी रस्ता सुरु करण्यासाठी अनेक वेळा निवेदन दिले आहे परंतु संबंधित प्रशासन टोलवा टोलवी करत आहे.

महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जी मुळे पालखी मार्गाचे सुद्धा काम रखडले आहे, यामुळे प्रभागात नेहमीच ट्राफिक जॅम होत असतो,

यामुळे आसपास ची जनता खरेदी करण्यासाठी या प्रभागात येण्यास टाळते जेणेंकरू प्रभागातील व्यवसायिकांचा सुद्धा आर्थिक नुकसान होत आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला लोकसेवा हक्क आयोगाचा दणका..!

सतत ट्राफिक जॅम असल्याने शालेय विध्यार्थींना , कामगार ,व्यावसायिक , रिक्षा चालक ,

स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासन सर्व सामान्य जनतेला जाणून बुजून त्रास देत आहात,

प्रभाग क्र २६ मध्ये जवळ पास १० ते १२ डी.पी रस्ते असून सुद्धा पुणे महानगरपालिका या बाबत उदासीन आहे.

त्या मुळे कमीत कमी सर्वे नं ७४ हांडेवाडी-मोहम्मदवाडी या दोन्ही रस्त्याला जोडणारा डी पी रस्ता व पालखी मार्गाचे काम जलदगतीने करून नागरिकांसाठी खुला करावे .

अन्यथा मनसेतर्फे समस्त त्रस्त नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मनसे चे सय्यद अझरुद्दीन यांनी दिला आहे.

VIDEO NEWS : Internet machine chori| फसवणूकीचे व इतर गंभीर गुन्हे दाखल होऊन ही आरोपी मोकाट

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular