वीज चोरी केल्याप्रकरणी हडपसर मधील “शिक्षणसम्राटा ”वर महावितरणची कारवाई..!

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offergolden night sex power suplimentlow-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

Light chori केल्याप्रकरणी आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन शफी यासीन सय्यद (इनामदार ) व त्याच्या मुलाकडून लाखो रुपये वसुली..

mahavitarans-action-on-educationist-in-hadapsar-for-doing-light-chori

Light chori news : सजग नागरिक टाईम्स : पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते ,

त्यात शिक्षण देणाऱ्या शिक्षक ,मुख्याध्यापक आणि संस्थाचालक , मालक हे विद्यार्थ्यांच्या नजरेत आदरणीय व्यक्ती असतात .

शिक्षकांचेच कामे तत्त्वे त्यांनी दिलेले संस्कार हे विद्यार्थी आत्मसात करून पुढील वाटचाल करत असतात.

परंतु सदर ट्रस्ट आणि संस्था चालकाकडून चुकीच्या पद्धतीने कामे केली जात असेल तर ते संस्कार विद्यार्थ्यांवर ही पडणार हे मात्र नक्की ?

Advertisement

पुणे हडपसर सय्यदनगर / गुलाम अलीनगर येथील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संस्थेला पुणे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ने मोठा झटका दिला आहे.

इतर बातमी : शफि इनामदाराच्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पुणे मनपाचे पत्र

हकीकत अशी की सय्यद नगर येथील सदरील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या शाळेत घरगुती विजेच्या मिटरचा वापर होत होता.

त्या विजेच्या मीटरचा वापर घरगुती ऐवजी कमर्शिअल प्रकारचा वापर होत असल्याची तक्रार सजग नागरिक टाईम्स च्या प्रतिनिधीने केल्यानंतर

Advertisement

सदरील संस्थेचा भांडाफोड झाला व महावितरणने चौकशी करून नोटीस बजावून संबंधित ट्रस्टच्या चेयरमेनला ४१ , ४०० ( एक्केचाळीस हजार चारशे) रुपये दंड भरण्यास सांगितले होते.

भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 नुसार चूक मान्य करून सदरील एज्युकेशन ट्रस्टने (एक्केचाळीस हजार चारशे) रुपयाच्या दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा केली.

तर त्याचे संचालक शफी यासीन सय्यद ( इनामदार) याच्या नावाने मुसाद्दिक कॉम्प्लेक्स येथील इमारतीत असलेल्या दुकानातील विद्युत मीटर मध्ये फेरफार केल्याचे महावितरणच्या निदर्शनास आणले,

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

महावितरणने तपासणी करून भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार नोटीस बजावून कारवाई सुरु केली ,

Advertisement

वीज चोरी बद्दल शफी यासीन सय्यद (इनामदार) याने महावितरणाला लेखी पत्र देऊन स्वीकार केले की

मी वीज चोरी केली आहे सदरील चोरीही ही पहिल्यांदा केली असल्याने मला माफ करावे

यानंतर महावितरणने शफी सय्यद कडून तडजोड रक्कम म्हणून 40 हजार 350 रुपयाचा दंड वसूल केला आहे .

आणि विशेष म्हणजे त्या एज्युकेशन ट्रस्टवर कार्याध्यक्ष असलेला त्याचा मुलगा फहीम शफी सय्यद (इनामदार ) यांच्या नावावरील मीटर मध्ये हि दोष आढळल्याने

याला हडपसर उपविभाग 2 फुरसुंगी विभागाने नोटीस बजावून भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 नुसार 31,500 (एकतीस हजार पाचशे रुपये)

Advertisement

दंड भरण्यास कळविले असता त्या दंडाची रक्कम ही कार्यअध्यक्षाने भरली आहे.

स्वतःला उच्चशिक्षित म्हणून मिरवणाऱ्या संचालकाला व त्याच्या मुलाला महावितरण ने झटका देऊन लाखो रुपयांची वसुली केले आहे.

या सर्व प्रकरणातून हे असे दिसून येत आहे कि या लोकांनी चो-या करण्याचेच उच्च शिक्षण घेतल्याचे दिसते?

यांना मिळालेल्या डिग-या हे खरे आहे कि त्यात हि घोळ झाला आहे यावर संशयाची सुई फिरत आहे ?.

Advertisement

संपूर्ण सय्यद नगर मध्ये या चोरी च्या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे ,

स्वत:ला वतनदार व रिस्पेक्टेड पर्सन म्हणून मिरवणारे किती मोठे रिस्पेक्टेड व्यक्तीमत्व आहे हे जग जाहीर झाले आहे .

Share Now